Ashtami Havan: महाष्टमीच्या दिवशी घरी कसे कराल हवन, जाणून घ्या मंत्रापासून ते पूजेच्या साहित्यापर्यंत सर्व

आध्यात्म
Updated Oct 22, 2020 | 11:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

Havan at home on Mahashtami: नवरात्रीच्या शेवटच्या तीन दिवसांत हवन-पूजन करण्याची प्रथा आहे. कोरोनाच्या काळात जर आपण स्वतः हवन करू इच्छित असाल तर आम्ही आपल्याला या पूजेच्या संपूर्ण विधीबद्दल सांगणार आहोत.

Navratri Havan
Ashtami Havan: महाष्टमीच्या दिवशी घरी कसे कराल हवन, जाणून घ्या मंत्रापासून ते पूजेच्या साहित्यापर्यंत सर्व  

थोडं पण कामाचं

  • नवरात्रीत हवन करण्याआधी हवनकुंड तयार करा
  • हवनकुंड हे नेहमी चौरसाकार आणि एकसमान असावे
  • हवनकुंड शेणाने सारवून वर धागा बांधावा

मुंबई: नवरात्रीत (Navratri) सप्तमी (Saptami), अष्टमी (Ashtami) आणि नवमीच्या (Navami) दिवसाला विशेष महत्व (more significance) असते. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी (goddess) धरतीवर येते, त्यामुळे तिच्या पूजेसह हवनही (Havan along with Pooja) केले जाते. यावेळी इतर सर्व देवतांसह कुलदेवतेचेही (Kuldevata) नाव घेतले जावे. सोबतच हवनासाठी कोणकोणत्या वस्तूंची (things required for Havan) गरज आहे याची यादी आधीपासूनच तयार करून ठेवावी जेणेकरून हवनात काहीही कमतरता राहू नये. जर आपण नवरात्रीचे हवन स्वतःच करू इच्छित असाल तर आम्ही आपल्याला या हवनाबाबत सर्व माहिती देणार आहोत.

वेदानुसार यज्ञ हे पाच प्रकारचे असतात- ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, वैश्वदेवयज्ञ आणि अतिथीयज्ञ. यातील देवयज्ञ हेच अग्निहोत्र कर्म आहे. यालाच हवन म्हणतात. हे अग्निहोत्र कर्म अनेक प्रकारे केले जाते. नवरात्रीत देवीसाठी हे हवन केले जाते.

हवनाच्या मंत्रापासून ते सामग्रीपर्यंत संपूर्ण माहिती

हवनकुंड: जर आपल्याकडे हवनकुंड असेल तर ठीक, अन्यथा आपण ८ विटांचे हवनकुंड तयार करू शकता. यानंतर हे कुंड शेण किंवा मातीने सारवून घ्या. कुंड हे नेहमी चौरसाकृती असावे. याची लांबी, रुंदी आणि खोली समान असावी. याच्या चारी बाजूला धागा बांधावा आणि स्वस्तिक काढावे. हवनकुंडात आंब्याच्या लाकडाने अग्नी प्रज्वलित करा आणि यात नारळ, तूप, मध इत्यादींची आहुती द्या.

हवनासाठी कोणते काष्ठ घ्यावे?

हवनाच्या सामग्रीत काष्ठ, समिधा आणि तूप घेऊ शकता. आंब्याची सुकलेली लाकडे याशिवाय नवग्रहांच्या नऊ समिधा (स्वेथार्क, पलाश, कधिरा, अपमर्ग, पिंपळ, अंजीर, शमी, दुर्वा, दर्भ) यांचाही समावेश करू शकता.

हवनाच्या सामग्रीची यादी

पेढे, १५ पाने, १५ सुपाऱ्या, १५ लवंगांच्या जोड्या, १५ छोटे वेलदोडे, १५ कमळाची पाने, २ जायफळ, २ तमालपत्र, पिवळी मोहरी, पाच मेवे, कुंकू, उडदाचे लाडू, ५० ग्रॅम मध, ५ ऋतूंची फळे, केळी, १ नारळ, लाल कापड, चुनरी, गुळवेल, ५ सराई, आंब्याची पाने, मोहरीचे तेल, कापूर, पंचरंग, केशर, रक्तचंदन, पांढरे चंदन, सितावर, काथ, भोजपत्र, काळी मिरची, खडीसाखर, डाळिंबाचे दाणे, १.५ किलो तांदूळ, एक किलो तूप, १.५ किलो बार्ली, तीळ २ किलो इत्यादी. उपलब्ध असतील ती सर्व फुले आणि पत्रीही या हवनात समाविष्ट करता येते.

हवनाचा विधी आणि मंत्र

देवीच्या पूजेनंतर अग्नीची स्थापना करा आणि नंतर आंब्याच्या लाकडांना कापुराने प्रज्वलित करा. यानंतर या मंत्रांनी आहुती देत हवन चालू करा.

ॐ आग्नेय नम: स्वाहा (ॐ अग्निदेव ताम्योनम: स्वाहा)।

ॐ गणेशाय नम: स्वाहा।

ॐ गौरियाय नम: स्वाहा।

ॐ नवग्रहाय नम: स्वाहा।

ॐ दुर्गाय नम: स्वाहा।

ॐ महाकालिकाय नम: स्वाहा।

ॐ हनुमते नम: स्वाहा।

ॐ भैरवाय नम: स्वाहा।

ॐ कुल देवताय नम: स्वाहा।

ॐ स्थान देवताय नम: स्वाहा

ॐ ब्रह्माय नम: स्वाहा।

ॐ विष्णुवे नम: स्वाहा।

ॐ शिवाय नम: स्वाहा।

ॐ जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा।

स्वधा नमस्तुति स्वाहा।

ॐ ब्रह्मामुरारी त्रिपुरांतकारी भानु: क्षादी: भूमि सुतो बुधश्च: गुरुश्च शक्रे शनि राहु केतो सर्वे ग्रहा शांति कर: स्वाहा।

ॐ गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु, गुरुर्देवा महेश्वर: गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम: स्वाहा।

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिंम् पुष्टिवर्धनम्/ उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् मृत्युन्जाय नम: स्वाहा।

ॐ शरणागत दीनार्त परित्राण परायणे, सर्व स्थार्ति हरे देवि नारायणी नमस्तुते।

यानंतर नवग्रहांच्या नावाने या मंत्राने आहुती द्या. गणेशाची आहुती द्या. सप्तशती किंवा नर्माण मंत्राचा जप करा. सप्तशतीच्या प्रत्येक मंत्रानंतर स्वाहा म्हणत आहुती द्या.

आधीपासून शेवटच्या अध्यायाच्या शेवटपर्यंत फुले, सुपारी, पान, कमळाची पाने, दोन लवंगा, दोन छोटे वेलदोडे, मधाची आहुती देऊन पाचवेळा तुपाची आहुती द्या.

तिसऱ्या अध्यायात गर्ज-गर्ज क्षणात मधाची आहुती द्या.

आठव्या अध्यायात मुखेन काली श्लोकावर रक्तचंदनाची आहुती द्या.

अकराव्या अध्यायाची आहुती खिरीने द्या. या अध्यायात सर्वाबाधा प्रशमनममध्ये काळ्या मिरचीची आहुती द्या. नर्वाण मंत्राने १०८ आहुती द्या.

शेवटी पूर्णाहुतीसाठी नारळात छेद करून त्यात तूप भरून धाग्याने बांधून पान, सुपारी, लवंग, जायफळ, बत्तासे, इतर प्रसाद ठेवून पूर्णाहुती मंत्र म्हणा- ‘ॐ पूर्णमद: पूर्णमिदम् पुर्णात पूण्य मुदच्यते, पुणस्य पूर्णमादाय पूर्णमेल विसिस्यते स्वाहा।’

पूर्णाहुतीनंतर देवीच्या समोर दक्षिणा ठेवा आणि कुटुंबासह आरती करून हवन पूर्ण करा आणि देवीची क्षमा करून मंगलकामना करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी