मार्गशीर्षातला पहिला गुरूवार, कशी करावी स्थापना आणि पुजा

आध्यात्म
Updated Dec 08, 2021 | 14:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरूवार ९ डिसेंबरला येत आहे. या दिवशी महालक्ष्मी व्रतास प्रारंभ होतो.

margashirsh
मार्गशीर्षातला पहिला गुरूवार, कशी करावी स्थापना आणि पुजा 
थोडं पण कामाचं
  • मार्गशीर्ष मासातला प्रत्येक गुरूवार हा व्रतासाठी खास असतो.
  • या दिवशी लक्ष्मीमातेची पुजा अर्चा केली जाते.
  • प्रत्येक गुरूवारी हे व्रत केल्यानंतर शेवटच्या गुरूवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. 

मुंबई: मार्गशीर्ष मासारंभाला(margshirsh month) सुरूवात झाली आहे. हा महिना म्हणजे लक्ष्मीमातेच्या(laxmi mata vrat) व्रताचा महिना. या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी मातेची पुजा अर्चा केली जाते. त्यामुळे या महिन्यातील चारही गुरूवार खास असतात. प्रत्येक गुरूवारी लक्ष्मी मातेची पुजा करून तिला नैवेद्य अर्पण केला जातो. पोथी वाचली जाते. यास महालक्ष्मीचे व्रत असे म्हणतात. हे व्रत कोणीही करू शकते. कुमारिका असो वा सुहासिनी महिला हे व्रत करू शकतात. मार्गशीर्षातला पहिला गुरूवार, कशी करावी स्थापना आणि पुजा...how to worship laxmi mata in margashirsh month

कधी आहे पहिला गुरूवाऱ

मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरूवार ९ डिसेंबरला येत आहे. या दिवशी महालक्ष्मी व्रतास प्रारंभ होतो. त्यानंतर चार गुरूवारी हे व्रत केले जाते. प्रत्येक गुरूवारी हे व्रत केल्यानंतर शेवटच्या गुरूवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. 

अशी करा पुजा अर्चा

मार्गशीर्ष मासातला प्रत्येक गुरूवार हा व्रतासाठी खास असतो. या दिवशी लक्ष्मीमातेची पुजा अर्चा केली जाते. त्यासाठी कलशात पाणी घ्यावे. त्यात दुर्वा, सुपारी आणि नाणे टाकावे. या तांब्यात पाच प्रकारच्या पाच पानांच्या डहाळ्या अथवा पाच प्रकारचे पाने घालावी. त्यावर नारळ ठेवावा. हा तयार कलश पाटावर लाल रंगाचे कापड अंथरून त्यावर तांदूळ अथवा गहू गोलाकार पसरवावेत. त्यावर हा कलश ठेवा. कलाशाच्या चारही बाजूला हळद कुंकुवाची बोटे लावावीत. त्यानंतर या कलशाला टेकून लक्ष्मी मातेची तसबीर ठेवावी. पुजा सुरू करण्याआधी तुळशीपत्राने देवीला स्नान घालावे. त्यानंतर हळद कुंकू वाहावे. धूप दीप लावावा. अगरबत्ती ओवाळावी. दुधाचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवावा. त्यानंतर लक्ष्मी मातेची कथा असलेली पोथी वाचावी. आपल्याला वाचता येत नसेल तर इतरांकडून वाचून घ्यावी. संध्याकाळी परत पुजा करावी. भोजनाचा नैवेद्य देवीला दाखवावा. त्यानंतर गाईस जेवण द्यावे आणि आपणही सर्व कुटुंबियांसह जेवावे. 

अशी म्हणा लक्ष्मीमातेची आरती

श्री महालक्ष्मीची आरती
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
जय देवी जय देवी...॥

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥

जय देवी जय देवी...॥

मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी॥

जय देवी जय देवी...॥

तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥

जय देवी जय देवी...॥

अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥

जय देवी जय देवी...॥

चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी