Navratri 2023: भारतीय लोकांच्या मनामध्ये देवाविषयी अतूट श्रद्धा असते . देवाची कृपा आपल्यावर व्हावी, यासाठी अनेक विविध पूजा-अर्चा करत असतात. देशातील कानाकोपऱ्यात देवांचे मंदिर आहेत. तेथे विविध प्रकारे पूजा केली जाते. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बांसगाव तहसीलमध्ये दुर्गा देवीचे एक प्राचीन मंदिर आहे. ( Human blood was offered to Goddess in this temple;A unique tradition has been going on for 300 years)
अधिक वाचा : तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे फळांचा राजा
या मंदिरात इतर मंदिराप्रमाणे पूजा होत असते.परंतु मंदिरातील एका विचित्र परंपरेबद्दल जाणून घेतल्यास तुमच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत. विशेष अशी विचित्र परंपरा 300 वर्षांपासून चालू आहे. या मंदिरातील दु्र्गा मातेला नैवेद्य म्हणून माणसांचं रक्त चढवलं जातं.
अधिक वाचा : लग्नाला उशिर कराल तर बाप बनण्यास होईल अडचण
मातेला नैवेद्य म्हणून नवजात बालक ते 100 वर्षाच्या वृद्धाचं रक्त दिलं जातं. लोकांचा असा विश्वास आहे की ज्यांच्या कपाळातून रक्त (लीलार) निघते. त्या मुलांवर किंवा त्या बालकांवर माता दुर्गांचा आशीर्वाद असतो.
दुर्गा देवीच्या या मंदिरात श्रीनेत वंशातील क्षत्रियांनी नवरात्रीच्या नवव्या दिवशी मातेच्या चरणी रक्त अर्पण करण्याची परंपरा आहे. ही परंपरा जवळपास 300 वर्षांपासून सुरू आहे. देश-विदेशात राहणारे श्रीनेत वंशाचे लोक या दिवशी येथे येतात आणि माता दुर्गाला रक्त अर्पण करतात.कोणाच्या घरात बाळ जन्मायला आले असेल तर त्याचं वय फक्त 12 दिवसांचं असेल तरी त्या बाळाला मंदिरात आणलं जातं. बाळ 12 दिवसांचं असेल तरी त्याचे रक्त देवी मातेला अर्पण केलं जातं.
अधिक वाचा : black coffee वजन कमी करण्यास खरोखर आहे का उपयुक्त?
परंपरानुसार, मंदिरात आलेले व्यक्ती शरीरातील 9 भागांचे रक्त काढत असतात. ते रक्त एका बेल पानात घेतलं जातं आणि देवीला अर्पण केलं जातं. ज्यामध्ये विशेष बाब म्हणजे मुलांच्या कपाळावर फक्त एक चीर मारली जाते. तर विवाहित पुरुषांच्या शरीराच्या 9 भागावर चीरालावून रक्त काढले जाते.
या परंपरेविषयी सर्वात मोठी गोष्ट समोर येते ती म्हणजे पशुबळी बंद करण्यासाठी ही प्रथा सुरू करण्यात आली होती. मुक्या प्राण्याची कत्तल होऊ नये म्हणून क्षत्रिय लोक मातेला आपलं रक्त अर्पण करायचे. शरीराच्या ज्या भागावर चीरा दिल्यास मंदिराच्या हवनकुंडातून बाहेर पडणारी राख त्या भागावर लावली जाते, त्यामुळे रक्तस्त्राव थांबतो.
अधिक वाचा : टक्कल पडू नये यासाठी वापरा हे 10 सर्वोत्तम नैसर्गिक केस तेल
मंदिराचे पुजारी श्रावण पांडे सांगतात की, इतक्या वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेनंतर आजपर्यंत एकाही भक्ताला कोणतीही समस्या उद्भभवली नाही. आजपर्यंत कुणालाही चीरा लागल्याने धनुर्वात झाला नाही आणि चीराची खूणही राहिली नाही. येथे रक्त अर्पण केल्याने माता प्रसन्न होते आणि भक्ताच्या कुटुंबात समृद्धी येते अशी लोकांची श्रद्धा आहे.