Vastu Tips for home: रात्री झोपताना बेडरूममध्ये पती-पत्नीने करू नये 'या' चुका, अन्यथा...

Vastu Tips for Bedroom: वास्तूशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. वास्तूशास्त्रात दिशांना खूप महत्त्व दिले गेले आहे. प्रत्येक दिशेला एक वेगळे महत्त्व देखील आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • पती आणि पत्नी यांच्यातील दुराव्याचं एक कारण वास्तू दोष सुद्धा असू शकते
  • बेडरूमच्या संदर्भात वास्तूशास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे? 
  • पती-पत्नीने वास्तूशास्त्राच्या संबंधात काय घ्यावी काळजी? 

Vastu Tips in Marathi: पती आणि पत्नी यांच्यात अनेकदा विनाकारण वाद होत असतात. या वादामागे वास्तू दोष हे देखील एक कारण असू शकते. बेडरूममध्ये झोपण्याच्या पद्धतीशी देखील हे संबंधित असू शकते. जर तुम्ही चुकीच्या दिशेने झोपत असाल तर वैवाहिक जीवनात तेढ निर्माण होऊ शकतात. जाणून घेऊयात पती आणि पत्नीने बेडरूममध्ये वास्तूच्या संबंधित काय काळजी घ्यावी. (husband and wife do not do this mistake in bedroom while sleeping vastu tips in marathi)

शास्त्रामध्ये पती आणि पत्नी यांच्यासाठी काही नियम सांगितले आहेत. या नियमांचे पाल केल्यास वैवाहिक आयुष्य सुखमय राहते. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात पत्नीने नेहमी उजव्या बाजूला बसावे असे शास्त्रात सांगितले आहे. तसेच इतर कार्यांत जसे की, (बसताना, झोपताना किंवा जेवण करताना) पत्नीने पतीच्या डावीकडे असायला हवे.

अधिक वाचा : Vastu Tips: झोपताना 'या' दिशेला करु नका पाय, तुमच्या आयुष्यातील काही वर्षे होतील कमी

वास्तूशास्त्र काय सांगते? 

वास्तूशास्त्रानुसार, घरातील कर्त्या पुरुषाने हाय एनर्जी झोन म्हणजेच उच्च ऊर्जा क्षेत्रात (दक्षिण) दिशेला झोपावे. पलंग अशा प्रकारे ठेवावा की, झोपल्यावर पती-पत्नीचे पाय हे दक्षिण दिशेला नसावे. दक्षिणेकडे डोके आणि उत्तर दिशेला पाय ठेवणे उत्तम मानले जाते.

अशा प्रकारे झोपण्याचे फायदे

वास्तूशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपल्याने पती-पत्नीच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणि मंगलमय वातावरण निर्माण होते. यासोबतच घरात कुठल्याही प्रकारे पैशांची अडचण, समस्या उद्भवत नाही.

(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी