Pitru Paksha 2020: स्वप्नात पित्र दिसले तर या गोष्टीचा असून हे संकेत 

स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा अर्थ असतो. स्वप्नात पित्र दिसले तर जीवनाशी निगडीत काही संकेत असतात. 

dream in shraddha paksha
स्वप्नात पित्र दिसले तर या गोष्टीचा असून हे संकेत  

थोडं पण कामाचं

  • पितृ पक्षात पित्रांचे श्राद्ध, पितृ तर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो.
  • तुम्हांला माहिती आहे का जर तुमच्या स्वप्नात पित्र दिसले तर त्याचा अर्थ काय होतो.
  • स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा अर्थ असतो.  

मुंबई :  पितृ पक्षात पित्रांचे श्राद्ध, पितृ तर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. तुम्हांला माहिती आहे का जर तुमच्या स्वप्नात पित्र दिसले तर त्याचा अर्थ काय होतो. स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा अर्थ असतो.  स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात पित्र दिसले तर जीवनाशी निगडीत काही संकेत असतात.  तर चला तर पाहू या स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात पित्र दिसले तर त्याचा काय अर्थ होतो. 

  1. स्वप्नात जर कोणी व्यक्ती आपल्या पित्रांना हसताना किंवा स्मित हास्य करताना दिसले तर त्याचा अर्थ तुमचे पित्र प्रसन्न आहेत. 
  2. स्वप्नात जर पित्र आनंद व्यक्त करताना किंवा मिठाई वाटताना दिसले तर त्याचा अर्थ तुमच्या घरात लवकर गुड न्यूज मिळू शकते. असे स्वप्न दिसणे म्हणजे घरात कोणाचा तरी विवाह होणार आहे किंवा कोणाच्या घरी पाळणा हलणार आहे. 
  3. स्वप्न कोणाचे पित्र दुखी किंवा नाराज दिसले तर त्याचा अर्थ होतो की, तुमचे पित्र प्रसन्न नाही. त्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करावे लागतील. त्यांना अपेक्षीत असतील अशा गोष्टी कराव्यात. 
  4. स्वप्न पित्र स्वतःहून समोर येऊन तुमच्याशी बोलत असतील तर त्याचा अर्थ त्यांना काही तरी सांगायचे आहे. असे असू शकते अशी घटना किंवा प्रसंगाची ते माहिती देऊ इच्छित आहेत की त्यांनी कोणाला सांगितली नाही, किंवा सांगायची राहून गेली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी