Chanakya Niti: बायका 'हे; काम करत असतील पुरुष गड्यांनी लगेच दुसरीकडे फिरवावे आपले डोळे

आध्यात्म
भरत जाधव
Updated Nov 25, 2022 | 09:49 IST

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिमध्ये पुरुषांसाठी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यानुसार पुरुषांनी त्या गोष्टी चुकूनही करू नयेत. दरम्यान या गोष्टी माहिती करूनही कोणी तसेच वागत असेल तर ते त्यांचे जीवन उद्धवस्त झाल्याशिवाय राहत नाही.  

Chanakya Niti
Chanakya Niti : बायका 'हे' काम करत असतील पुरुषांनी लगेच फिरवावेत आपले डोळे   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिमध्ये पुरुषांसाठी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यानुसार पुरुषांनी त्या गोष्टी चुकूनही करू नयेत.
  • स्त्रिया देखील पुरुषांच्या बरोबरीने बसून अन्न खाऊ लागल्या आहेत.
  • अनेकवेळा स्त्रिया श्रृंगार करतात तेव्हा पुरुष त्यांच्याकडे बघू लागतात.

Chanakya Niti: कौटिल्य, विष्णू गुप्त आणि वात्सायन या नावाने प्रसिद्ध असलेल्या आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांचे जीवन सर्व प्रकारच्या रहस्यांनी भरलेले आहे. त्यांनी लिहिलेल्या चाणक्य नीतिची देशातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. जर एखाद्या व्यक्तीला जीवनात आनंदी राहायचे असेल तर त्याने आपल्या वैयक्तिक जीवनात आचार्य चाणक्यांच्या नीतिचा अवलंब केला पाहिजे. देशातील प्रसिद्ध अर्थतज्ञ आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर संपूर्ण जगात आपल्या ज्ञानाचा डंका वाजवला आहे. त्यांनी आपल्या लेखांमध्ये मानवी जीवनाशी निगडीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांचे पालन केल्याने केवळ पुरुषच नाही तर महिलांचेही जीवन आनंदाने जात असते.   (If the women are doing this work, the men should immediately turn their eyes)

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिमध्ये पुरुषांसाठी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यानुसार पुरुषांनी त्या गोष्टी चुकूनही करू नयेत. दरम्यान या गोष्टी माहिती करूनही कोणी तसेच वागत असेल तर ते त्यांचे जीवन उद्धवस्त झाल्याशिवाय राहत नाही.  

पुरुष गड्यांनी कोणत्या गोष्टी करु नये 

 जेवण करणाऱ्या महिलांना पाहू नका   

आजकाल वागणुकीतील बदलासोबतच स्त्रिया देखील पुरुषांच्या बरोबरीने बसून अन्न खाऊ लागल्या आहेत, परंतु आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्र या पुस्तकात याबद्दल काय सांगितले आहे, जाणून घेणं आवश्यक आहे. आचार्य चाणक्यांनुसार,   कोणत्याही पुरुषाने  जेवायला बसलेल्या स्त्रीकडे कधीच पाहू नये.  हे शिष्टाचाराच्या विरुद्ध आहे आणि जेवणारी स्त्री देखील अस्वस्थ होते आणि नीट खाऊ शकत नाही.

कपडे नीट करणारी स्त्री 

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, एखादी महिला किंवा मुलगी जर तिचे कपडे ठीक करत असेल तर पुरुषांची नजर नक्कीच तिच्याकडे जाते. चाणक्याच्या नीतिशास्त्रात हा गुन्हा मानला गेला आहे. यामुळे चाणक्य म्हणतात की, पुरुषांनी चुकूनही कपडे फिक्स करणाऱ्या महिलांकडे पाहू नये.  पुरुषांनी महिलांना शिंकताना आणि जांभई देताना पाहू नये. हे पुरुषांच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे.

श्रृंगार करत असलेल्या स्त्रीकडे पाहू नका 

अनेकवेळा स्त्रिया श्रृंगार करतात तेव्हा पुरुष त्यांच्याकडे बघू लागतात. पुरुषांनी हे करू नये. विशेषत: काजळ लावणाऱ्या महिलांकडे पुरुषांनी कधीच  पाहू नये. एवढेच नाही तर महिला स्वतःला किंवा मुलांसाठी तेल मसाज करत  असतील तर  पुरुषांनी त्या महिलांकडे पाहू नये. असे मानले जाते की आचार्य चाणक्यांच्या धोरणांमध्ये सांगितलेल्या या गोष्टींचे पालन केल्याने पुरुषांना समाजात सन्मान मिळतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी