घरात आर्थिक संकट असेल तर 'या' दिवशी करा 'हे' उपाय, होईल धनाचा साठा

आध्यात्म
भरत जाधव
Updated Aug 19, 2022 | 10:38 IST

सध्या बहुतेकजण आर्थिक (financial) अडचणीमध्ये अडकलेले आहेत. अनेकांकडे कमावलेल्या पैसा वाचत नाहीये. कितीही केलं तर धनाचा संचय होत नसल्याची खदखद अनेकजण बोलून दाखवत असतात. पण वाचकांनो जर तुम्ही थोडं याकडे आध्यात्मच्या (Spirituality) नजरेने पाहिलं तर तुम्हाला त्याचा उपाय सापडेल.

If there is a financial crisis in the house, do this remedy on this day
घरात आर्थिक संकट असेल तर या दिवशी करा 'हे' उपाय  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गुरुवारी सकाळी स्नान करून बृहस्पति देवाची पूजा करावी.
  • तुमच्या कामात व्यत्यय येत असेल तर गुरुवारी काही विशेष उपाय केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.
  • गुरुवारी ना कोणाला उधार देऊ नका ना कोणाकडून उधार घेऊ नका.

मुंबई :  सध्या बहुतेकजण आर्थिक (financial) अडचणीमध्ये अडकलेले आहेत. अनेकांकडे कमावलेल्या पैसा वाचत नाहीये. कितीही केलं तर धनाचा संचय होत नसल्याची खदखद अनेकजण बोलून दाखवत असतात. पण वाचकांनो जर तुम्ही थोडं याकडे आध्यात्मच्या (Spirituality) नजरेने पाहिलं तर तुम्हाला त्याचा उपाय सापडेल. या समस्येवर तुम्हाला उपाय हवा असेल तर भगवान विष्णू (Lord Vishnu) आणि बृहस्पती देव यांची पूजा केली पाहिजे. गुरुवारी या देवांची पूजा केली जाते. 

गुरु बलवान असेल तर व्यक्तीला जीवनात खूप प्रगती होते, त्याची सर्व कामे यशस्वी होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. याउलट जर गुरु कमजोर असेल तर व्यक्तीला प्रत्येक कामात अपयश येते आणि तो आर्थिक विवंचनेने त्रस्त राहतो. जर तुमच्या कामात व्यत्यय येत असेल आणि पैशांची तंगी राहिली असेल तर गुरुवारी काही विशेष उपाय केल्यास तुमच्या सर्व समस्या दूर होतील. गुरुवारी सकाळी स्नान करून बृहस्पति देवाची पूजा करावी. यानंतर तुळशीच्या माळाने ओम बृहस्पते नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल. यासोबतच तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील.

Read Also : दुर्मिळ पण घातक स्क्रब टायफस आजाराचा राज्यात शिरकाव

गुरुवारची पूजा नेहमी पिवळे वस्त्र परिधान करून करावी. यामुळे भगवान विष्णू तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. संपत्ती आणि वैभवाची देवी लक्ष्मीचीही पूजा गुरुवारी करावी. यामुळे धन आणि धनाशी संबंधित समस्या दूर होतात. आपल्यावर आर्थिक संकट येऊ नये असं तुम्हाला वाटतं असेल तर गुरुवारी ना कोणाला उधार देऊ नका ना कोणाकडून उधार घेऊ नका. असे मानले जाते की गुरुवारी असे केल्याने आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण होते.

Read Also : Horoscope Today : पाहा तुमच्यासाठी आजचा दिवस कसा जाईल

या दिवशी भगवान विष्णूला केळी अर्पण करावी. याशिवाय त्यांना पिवळी फुले, हरभरा डाळ आणि गूळ अर्पण करावेत. देवाला अर्पण केलेल्या केळीचे सेवन स्वतः करू नका हे लक्षात ठेवा. पती-पत्नीमध्ये काही समस्या असल्यास दोघांनीही गुरुवारी उपवास करावा. यामुळे तुमच्या दोघांच्या आयुष्यात आनंद आणि प्रेम वाढेल.

Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ कोणत्याही प्रकारच्या प्रमाणीकरणास, माहितीला मान्यता देत नाही.  
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी