Dream Atrology: स्वप्नात जर मोर दिसला तर समजून जा की तुम्ही होणार धनवान...

आध्यात्म
Updated Aug 16, 2022 | 17:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

Peacock Dream: झोपेत स्वप्ने येणे ही सामान्य गोष्ट आहे. अनेकदा तुम्ही लोकांकडून ऐकले असेल की सकाळी पाहिलेली स्वप्ने शुभ असतात. अनेकदा रात्री पाहिलेली स्वप्नेही लाभदायक असतात. जर तुम्ही स्वप्नात मोर पाहिला असेल तर हे नक्कीच चांगले संकेत आहेत. 

peacock
स्वप्नात जर मोर दिसला तर समजून जा की तुम्ही होणार धनवान... 
थोडं पण कामाचं
  • जर तुम्ही स्वप्नात साप आणि मोराची लढाई पाहिली असेल तर हे स्वप्न तुमच्यासाठी शुभ संकेत देणारे असेल.
  • जर तुम्ही स्वप्नात मोरासह शनी महाराजांना पाहत आहात तर अशी स्वप्ने चांगली मानली जातात.
  • जर तुम्ही स्वप्नात सफेद रंगाचा मोर पाहिला तर हे स्वप्न अतिशय सुखद मानले जाते.

मुंबई: अनेकदा आपण स्वप्नात(dream) विचित्र गोष्टी पाहतो. स्वप्नाशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. स्वप्नांचे जग हे विचित्र असते. स्वप्नशास्त्रात(dream astrology) अनेक ठिकाणी विस्ताराने सांगितले आहे. तुम्ही ऐकले असेल की सकाळी पाहिलेली स्वप्ने ही शुभ असतात मात्र अनेकदा रात्रीची स्वप्नेही लाभदायक ठरतात. जर तुम्ही स्वप्नात कधी मोर पाहिला असेल तर त्याचा काय अर्थ असेल बरे?If you see peacock in dream then you will be rich

अधिक वाचा - युवराज सिंगने मैदानात ठोकले चौकार, षटकार, पाहा VIDEO

साप आणि मोराची लढाई पाहणे

जर तुम्ही स्वप्नात साप आणि मोराची लढाई पाहिली असेल तर हे स्वप्न तुमच्यासाठी शुभ संकेत देणारे असेल.स्वप्नशास्त्रानुसार असे स्वप्न येणे म्हणजे शत्रू कमी होणे. असे स्वप्न आले याचा अर्थ तुमचे शत्रू तुमच्याविरोधात जो कट रचत आहेत ते सफल होणार नाही. 

स्वप्नात शनी महाराजांसह मोर पाहणे

जर तुम्ही स्वप्नात मोरासह शनी महाराजांना पाहत आहात तर अशी स्वप्ने चांगली मानली जातात. शनी चालिसानुसार अशा स्वप्नांचा अर्थ तुम्हाला धनलाभ होणार आहे. प्रगतीच्याही अनेक संधी मिळणार आहेत. 

मोर आणि लांडोराचे प्रेमसंबंध

जर तुम्ही स्वप्ननात मोर आणि लांडोर एकत्र पाहत असाल तर हे नक्कीच शुभदायी आहे. मोर-लांडोर एकत्र पाहणे हे प्रेमसंबंधांसाठी चांगले असते. अशा स्वप्नाचा अर्थ म्हणजे तुमचे जोडीदारासोबत चांगले संबंध आहेत आणि प्रेम वाढेल. 

अधिक वाचा - मुलीच्या जन्माच्या ४ महिन्यांतच पुन्हा आई होणार ही अभिनेत्री

सफेद रंगाचा मोर पाहणे

जर तुम्ही स्वप्नात सफेद रंगाचा मोर पाहिला तर हे स्वप्न अतिशय सुखद मानले जाते. या पद्धतीचे स्वप्न येणे म्हणजेच तुम्ही श्रीमंत होण्याचे संकेत आहेत. याचा अर्थ की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे. स्वप्नात सफेद मोर दिसणे म्हणजेच अचानक कुठूनतरी धनलाभ होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी