Lucky tips: सकाळच्या वेळेस या गोष्टी दिसल्या तर समजून जा चांगला जाईल दिवस, होईल लक्ष्मीची कृपा

आध्यात्म
Updated Jun 01, 2022 | 17:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Lucky tips: ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी बघणे आणि असणे शुभ मानले जाते. यावरच व्यक्तीचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो. अशातच अनेक गोष्टी आहेत जे सकाळी पाहिल्याने असे संकेत मिळतात की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे. 

morning
सकाळी या गोष्टी दिसल्या तर तुमच्यावर होईल लक्ष्मीची कृपा 
थोडं पण कामाचं
  • सकाळी उठल्यावर आपल्या हातांचे दर्शन घेतल्याने व्यक्तीचे जीवन सुख-समृद्धी, आनंद आणि सौभाग्याची प्राप्ती होते.
  • ज्योतिषशास्त्रा सकाळ्या वेळेस दिसणाऱ्या काही संकेताबद्दलही सांगण्यात आले आहे
  • सकाळी उठताच या गोष्टींना बघणे शुभ मानले जाते.

मुंबई: ज्योतिषशास्त्रात(astrology) असे मानले जाते काही सकाळच्या वेळेस काही गोष्टी दिसणे अतिशय शुभ मानले जाते. जर सकाळच्या वेळेस काही शुभ गोष्टी(shubh things) दिसल्या तर त्या व्यक्तीचा पूर्ण दिवस चांगला जातो. सोबतच लक्ष्मी मातेची कृपा राहते. ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहे की सकाळी डोळे उघडताच व्यक्तीने आपले दोन्ही हात पाहिले पाहिजे. असे मानले जाते की आपल्या हातात सरस्वती देवीसह ब्रम्हा आणि लक्ष्मी मातेचा वास असतो. If you see this things in morning then you can get financial benefit

अधिक वाचा - घोड्याची नाल करेल कमाल

सकाळी उठल्यावर आपल्या हातांचे दर्शन घेतल्याने व्यक्तीचे जीवन सुख-समृद्धी, आनंद आणि सौभाग्याची प्राप्ती होते. सोबतच ज्योतिषशास्त्रा सकाळ्या वेळेस दिसणाऱ्या काही संकेताबद्दलही सांगण्यात आले आहे. सकाळी उठताच या गोष्टींना बघणे शुभ मानले जाते. जाणून घेऊया कोणत्या गोष्टी सकाळच्या वेळेस बघणे शुभ असते. 

सकाळच्या वेळेस या गोष्टी पाहणे असते शुभ

सकाळी डोळे उघडताच चिमण्यांची चिवचिव ऐकू आली तर समजून जा की तुमच्या दिवसाची सुरूवात चांगली होणार आहे. 

सकाळच्या वेळेस जर एखादी लग्न झालेली महिला तयार होऊन अथवा हातात पुजेची थाली घेतलेली दिसली तर ते शुभ मानले जाते. याचा अर्थ तुम्हाला एखादे मोठे काम मिळणार आहे. 

सकाळी-सकाळी सफेद फूल, हत्ती दिसणे अतिशय शुभ मानले जाते. अशा गोष्टी दिसल्यास त्या व्यक्तीवर लक्ष्मी मातेची कृपादृष्टी राहते. 

ज्योतिषशास्त्रानुार सकाळच्या वेळेस दूध, दही हे पाहणे शुभ मानले जाते. हे तुमच्या चांगल्या भाग्याच्या दिशेने इशारा करतात. 

तसेच गाय दिसणेही अतिशय शुभ संकेत मानले जातात. जर एखाद्या व्यक्तीला सकाळी गायीचे दर्शन होत असेल तर याचा अर्थ धनलाभाची शक्यता आहे. 

अधिक वाचा - सोनिया, राहुल गांधींच्या मानेवर पुन्हा 'हेराल्ड'चे भूत

जर सकाळच्या वेळेस घराच्या बाहेर कोणी साफ-सफाई करताना दिसत असेल तर हा ही शुभ संकेत मानला जातो. अशी मान्यता आहे की अस काही पाहिल्याने त्या व्यक्तीची मोठ्या समस्येतून सुटका होणार आहे. 

सकाळच्या वेळेस श्रीफळ, शंख, सुपारी हे पाहणेही शुभ फलदायी असते. यामुळे धनलाभ होण्याची शक्यता असते. 

जर सकाळी डोळे उघडताच मंदिर अथवा मंदिरात वाजणाऱ्या घंटाचा आवाज ऐकू आला तर हे अतिशय शुभ मानले गेले आहे. यामुळे त्या व्यक्तीस शुभ बातमी मिळू शकते. अथवा बिघडलेले काम पूर्ण होऊ शकते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी