Vastu Tips:: घरामध्ये सौभाग्य हवं असेल तर नक्की करा हे 5 उपाय, मग पहा माता लक्ष्मीचा चमत्कार

आध्यात्म
भरत जाधव
Updated Aug 13, 2022 | 09:55 IST

जीवन (life) चांगले बनवण्यासाठी आपण सर्वजण खूप मेहनत घेतो. तरीही अनेक वेळा त्या मेहनतीचे (hard work) पुरेसे फळ मिळत नाही. याचे कारण म्हणजे आपण कळत किंवा नकळत केलेल्या चुका, ज्यावर आपण पुरेसे लक्ष देत नाही आणि नकळत आपल्या घरात दुर्दैवाचा प्रवेश होतो.

If you want good fortune in your home, do these 5 remedies
Vastu Tips:: घरामध्ये सौभाग्य हवं असेल तर नक्की करा हे 5 उपाय   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • सूर्यास्तानंतर कधीही झाडू किंवा पुसू नये.
  • जर खोलीत कचरा पसरला असेल तर त्या खोलीत झोपलेल्या व्यक्तीचे नशीब दुर्दैवात बदलते.
  • कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे असभ्यतेचे लक्षण मानले जाते.

Remedies to please Mata Lakshmi: जीवन (life) चांगले बनवण्यासाठी आपण सर्वजण खूप मेहनत घेतो. तरीही अनेक वेळा त्या मेहनतीचे (hard work) पुरेसे फळ मिळत नाही. याचे कारण म्हणजे आपण कळत किंवा नकळत केलेल्या चुका, ज्यावर आपण पुरेसे लक्ष देत नाही आणि नकळत आपल्या घरात दुर्दैवाचा प्रवेश होतो. चला जाणून घेऊया घरामध्ये सौभाग्य (good luck) आणण्यासाठी कोणत्या 5 गोष्टी केल्या पाहिजेत.

सूर्यास्तानंतर झाडू नका

सूर्यास्तानंतर कधीही झाडू किंवा पुसू नये असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. घर आणि दुकान सूर्यास्तानंतर साफ ​​करत असाल तर घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. कुटुंबात कलह सुरू होतो. त्यामुळे आर्थिक संकटाचे अंतहीन चक्र सुरू होते. खोली अस्ताव्यस्त ठेवणे म्हणजे दुर्दैवाला आमंत्रण देणे होय. जर तुमचा अथरुण नीट नसेल किंवा घाण असेल. जर खोलीत कचरा पसरला असेल तर त्या खोलीत झोपलेल्या व्यक्तीचे नशीब दुर्दैवात बदलते. यामुळे तुम्ही आपले घर स्वच्छ आणि नीट व्यवस्थित अवरुन ठेवण्याकडे लक्ष द्या. 

Read Also : महिला आयपीएलसाठी बीसीसीआयचा प्लॅन तयार

सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका 

कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे असभ्यतेचे लक्षण मानले जाते.  विशेषतः जर ते ठिकाण मंदिर, घर किंवा मंदिर असेल. तुमच्या अशा कृतीमुळे देवी लक्ष्मी घराबाहेर पडते. त्यामुळे घरात गरिबीचे कायमचे निवासस्थान होते. अशी परिस्थिती आपल्या कुटुंबावर येऊ नये म्हणून नेहमी स्वतःवर नियंत्रण ठेवा.

Read Also : गृहमंत्रालयाने स्वातंत्र्य दिनानिमित्त जारी केल्या सूचना

स्नानगृह म्हणजे पाणी वापरण्याचे ठिकाण. हे चंद्राचे स्थान मानले जाते. ज्या घरांमध्ये बाथरुमच्या स्वच्छतेकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, तेथे आजार शिरायला वेळ लागत नाही. अशा घरांच्या मालकाच्या कुंडलीत चंद्रावर ग्रहण असते आणि संपत्ती आणि वैभव संपुष्टात येऊ लागते. म्हणून, बाथरूमच्या स्वच्छतेकडे सक्तीने लक्ष देणे सुरू करा.

ताटात उरलेले अन्न कधीही सोडू नका

अन्नधान्य हा देवतेचा प्रसाद मानला जातो. त्यामुळे ताटात अन्न कधीही सोडू नये, तसेच भांडी घाणरेडी ठेवत असाल तर गरिबी येत असते. तुम्ही जर ही दोन्ही कामे करत असाल तर घरातील दुर्दैवाला थेट आमंत्रण देत असाल. रात्री झोपताना खरकटी भांडी धुवून झोपी जा. अन्यथा घरामध्ये अशांततेचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल ज्याचे रुपांतर घराच्या दुर्दैवात होईल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी