लक्ष्मी मातेची वर्षभर कृपा हवी असल्यास सोडू नका आजच्या पोर्णिमेची संधी, या पोर्णिमेला 'हे' उपाय

आध्यात्म
भरत जाधव
Updated Dec 19, 2021 | 11:53 IST

Margashirsh Purnima: हिंदू (Hindu) धर्मात (Religion) पोर्णिमा-अमावस्या (New moon) महत्व असतं, परंतु  काही अमावस्या आणि पोर्णिमा (Purnima) अधिक महत्त्वाच्या असतात. मार्गशीर्ष महिन्याच्या पोर्णिमा (Margashirsh Purnima) पण यातील एक आहे.

If you want the grace of Goddess Lakshmi all year round
पोर्णिमा: लक्ष्मी मातेची कृषा हवी असल्यास करा हे उपाय   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • आज म्हणजेच १९ डिसेंबरला काही खास उपाय (पैशाचे उपाय) केल्याने लक्ष्मी मातेची कृपा वर्षभर राहील.
  • मार्गशीर्ष पौर्णिमेचा संपूर्ण दिवस देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्याच्या दृष्टीने खूप खास आहे.
  • नोकरी-व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीजीची पूजा करा

Margashirsh Purnima: नवी दिल्ली:  हिंदू (Hindu) धर्मात (Religion) पोर्णिमा-अमावस्या (New moon) महत्व असतं, परंतु  काही अमावस्या आणि पोर्णिमा (Purnima) अधिक महत्त्वाच्या असतात. मार्गशीर्ष महिन्याच्या पोर्णिमा (Margashirsh Purnima) पण यातील एक आहे.  यातील एक कारण म्हणजे त्याचा महिमा भगवान श्रीकृष्णाने (Lord Shri Krishna) स्वतः सांगितला आहे. त्यांनी गीते (Geeta) मध्ये सांगितले की, मीच मार्गशीर्ष आहे. याशिवाय वर्षातील या शेवटच्या पौर्णिमेला अनेक शुभ योगही तयार होत आहेत, त्यामुळे हा दिवस अधिकच लाभदायक ठरला आहे. आज म्हणजेच १९ डिसेंबरला काही खास उपाय (पैशाचे उपाय) केल्याने लक्ष्मी मातेची कृपा वर्षभर राहील. हे उपाय केल्याने पैशाची टंचाई जवळूनही भासणार नाही.

लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळविण्याचे उपाय

  • मार्गशीर्ष पौर्णिमेचा संपूर्ण दिवस देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्याच्या दृष्टीने खूप खास आहे. सकाळपासून घर स्वच्छ केल्यानंतर गंगाजल शिंपडावे.
  •  मुख्य गेटवर आंब्याच्या पानांचे किंवा अशोकाच्या पानांचे तोरण लावावे. गेटच्या दोन्ही बाजूंना हळदीने स्वस्तिक बनवावे. घराच्या दारावर हळद आणि कुंकू लावा. संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा. तुमच्या घरात मां लक्ष्मीचा वास सदैव राहील.
  • मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मीच्या सर्व रूपांची पूजा केल्यानंतर मातेला कुंकू, गाई, चांदीची नाणी आणि हळद अर्पण करा. संध्याकाळी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर या वस्तू लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. लक्ष्मी मातेच्या कृपा होईल. 
  • पौर्णिमेच्या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण केल्याने लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते. हा पाठ प्रत्येक आर्थिक समस्या दूर करेल. 
  • दुसरीकडे नोकरी-व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीजीची पूजा करा, पाणी आणि श्रृंगार करा. संध्याकाळी तुळशीच्या जवळ तुपाचा दिवा लावा, तसेच विवाहित स्त्रीला श्रृंगाराच्या वस्तू भेट द्या. 
  • पौर्णिमेच्या संध्याकाळी घराच्या ईशान्य (पूर्व-उत्तर दिशेला) तुपाचा दिवा लावा. जीवनात असे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा होते आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी