Aadishakti Aai Ekvira Devi : आदिशक्ती आई एकवीरा देवीचे महात्म्य, देवीच्या दर्शनाला कसे जाल?

importance history and significance of aadishakti aai ekvira devi, aadishakti aai ekvira devi palkhi sohala, aadishakti aai ekvira devi palki sohala : आदिशक्ती आई एकवीरा देवी ही एक हिंदू देवता आहे. भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकवीरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते.

importance history and significance of aadishakti aai ekvira devi
आदिशक्ती आई एकवीरा देवी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • आदिशक्ती आई एकवीरा देवीचे महात्म्य
  • आदिशक्ती आई एकवीरा देवीच्या दर्शनाला कसे जाल?
  • कधी आहे एकवीरा देवीचा पालखी सोहळा?

importance history and significance of aadishakti aai ekvira devi, aadishakti aai ekvira devi palkhi sohala, aadishakti aai ekvira devi palki sohala : आदिशक्ती आई एकवीरा देवी ही एक हिंदू देवता आहे. भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकवीरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते.

एकवीरा आईचे मंदिर महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. एकवीरा देवीची उपासना करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने आगरी-कोळी, सीकेपी, दैवज्ञ ब्राह्मण, कुणबी आहेत. पण आता वेगवेगळ्या समाज वर्गातील नागरिक देवीच्या दर्शनाला गर्दी करतात.

कार्ला येथे मंदिर संकुलात एकसारख्या बांधणीची पश्चिमाभिमुख अशी एका ओळीतली तीन मंदिरे आहेत. यातले मधले आणि दक्षिणेचे मंदिर सुस्थितीत आहे. उर्वरित बांधकामाची पडझड झाली आहे. पडझड झालेल्या बांधकामाचे अस्तित्व फक्त नकाशांवर उरले आहे. तिन्ही देवळांच्या समोर महामंडप, वर्षामंडप, गोपुर आहे. ही तिन्ही मंदिरे मुख्य देवतेच्या परिवारातील सोळा सदस्य देवतांच्या मंदिरांनी वेढलेली आहेत. अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात. या देवीला मनापासून केलेला नवस पूर्ण होतो असे सांगतात. 

एकवीरा देवीची दंतकथा

वनवासात असताना पांडवांनी एकवीरा देवीचे मंदिर बांधले असे सांगतात. वनवासात या भागात असताना पांडवांसमोर एकवीरा देवी प्रकट झाली. देवीने दिलेल्या आज्ञेनुसार पांडवांनी एका रात्रीत मंदिर बांधले, असे सांगतात. हे कार्य केल्यामुळे देवी पांडवांवर प्रसन्न झाली आणि तिने अज्ञातवासातील एका वर्षात तुम्हाला कोणीही ओळखू शकणार नाही असा वर पांडवांना दिल्याचे सांगतात. 

कार्बन डेटिंगनुसार भव्य मंदिराची निर्मिती इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापासून ते दुसऱ्या शतकापर्यंत आणि पाचव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत अशा दोन टप्प्यात झाली. 

एकवीरा देवीच्या मंदिराचे स्थान

एकवीरा आईचे मंदिर महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ डोंगरावर आहे. मंदिर लेण्यांनी वेढलेले आहे. मुख्य देवता एकवीरा माता तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहेत. टेकडीच्या अर्ध्या भागामध्ये देवीच्या पवित्र पायांसाठी एक मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. 

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात प्या ही समर ड्रिंक्स

ही भाजी खा आणि स्मरणशक्ती वाढवा

उन्हाळ्यात हेल्दी आणि फिट राहण्यासाठी खा ही 7 फळे

आदिशक्ती आई एकवीरा देवीच्या दर्शनाला कसे जाल?

आदिशक्ती आई एकवीरा देवीचे मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यापासून आठ किमी अंतरावर आहे. लोणावळ्यापासून ते एकवीरा मंदिरापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अनेक बस (एसटी / Maharashtra State Road Transport Corporation : MSRTC) आहेत. ऑटो रिक्षादेखील उपलब्ध आहेत. सेंट्रल पॉईंट लोणावळा (शिवनेरी बस स्टॉप) पासून पाच किमी अंतरावर तर पुणे शहरापासून 49 किमी अंतरावर आणि मुंबईपासून 97 किमी अंतरावर मंदिर आहे.  पुणे लोणावळा मार्गावरील लोणावळ्याच्या अलिकडील मळवली रेल्वे स्टेशनपासून देवीचे मंदिर पायी चालत जाण्याच्या अंतरावर आहे. पुणे ते लोणावळा ही लोकल सेवा पण नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध आहे.

कधी आहे एकवीरा देवीचा पालखी सोहळा ( Ekvira Devi Palkhi Sohala ) 

आदिशक्ती आई एकवीरा देवीचा पालखी सोहळा मंगळवार 28 मार्च 2023 रोजी आहे. 

परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी करा हे उपाय

टक्कल आणि केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी पुरुषांसाठी नैसर्गिक तेल

बेलपत्र खाण्याचे फायदे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी