शनि अमावस्येच्या दिवशी अशा प्रकारे पूजा विधी केली तरच कमी होईल साडेसाती

हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यातील अमवास्येचे विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्याला अगहन महिना म्हणूनही ओळखले जाते. यासाठी ही अमावस्या अगहन अमावस्या नावाने ओळखली जाते.

importance of shani amavasya 2021
शनि अमावस्येच्या दिवशी दूर होईल साडेसाती आणि संकटे   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शनिच्या वक्रदृष्टीपासून वाचण्यासाठी शैनेश्वरी अमावस्येचा दिवस अतिशय शुभ असतो
  • साडेसाती संपवण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.
  • या आमावस्येला शैनेश्वरी अमवास्या म्हणून ओळखले जाते.

shani amavasya : नवी  दिल्ली :  सोमवार मार्गशीर्ष (Margashirsha) महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस आहे. हिंदू धर्मात (Hinduism) मार्गशीर्ष महिन्यातील अमवास्येचे विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्याला अगहन महिना म्हणूनही ओळखले जाते. यासाठी ही अमावस्या अगहन अमावस्या नावाने ओळखली जाते. यंदा अमावस्या शनिवारी आली होती,  या आमावस्येला शैनेश्वरी अमवास्या म्हणून ओळखले जातं.  शनिच्या वक्रदृष्टीपासून वाचण्यासाठी शैनेश्वरी अमावस्येचा दिवस अतिशय शुभ असतो. साडेसाती संपवण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा असतो. या दिवशी शनीदेवाची पूजा केल्यानंतर जीवनातील सर्व संकट समाप्त होतात.

शनी पूजा याप्रकारे केली का?

शनी  अमावस्येला पूजा विधी कशी असते ते जाणून घेऊ. शनी अमावस्येच्या दिवशी लवकर उठावे लागते. एका लाकडी पाटावर काळ्या रंगाचे कापड अंथरावे. त्यावर शनी देवाचा फोटो, यंत्र आणि सुपारी ठेवावी. त्यानंतर फोटो समोर दिवा लावावा. शनी देवाला अबीर, गुलाल, कूंकू आणि काजळ लावून निळ्या रंगाची फुले अर्पण करावी. त्यानंतर शनी देवाला पुरी भाजीचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर ५, ७, ११  किंवा २१ वेळा शनी मंत्राचा जाप करावा तसेच शनी चालीसा बोलून शनी देवाची आरती करावी  

मंदिरात दिवा लावावा

शनी मंदिरात जाऊन शनी देवाजवळ दिवा लावावा. तसेच नैवेद्य दाखावावा. या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावावा. शनी अमावस्येच्या दिवशी काळे तीळ, काळे उडीद, काळे कपडे अशा वस्तू गरीबांबा दान करावे. नंतर शनी स्रोता तीन वेळा म्हणावे. शनी मंत्र आणि शनी चालीसाही म्हणावी. यामुळे शनीचा कोप होत नाही आणि आयुष्यात संकट येत नाही. शनी देवाची कृपा होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी