zodiac signs : नवी दिल्ली: ज्योतिषशास्त्रानुसार, काही काळानंतर ग्रह आपली स्थिती जागा बदलत असतात. या ग्रहाची जागा बदलण्याच्या स्थितीमुळे आपल्या जीवनावर मोठा परिणाम करत असतं. विशेषत: शनी, गुरू, सारखे काही ग्रहांची स्थितीमध्ये बदल झाला तर आपल्या जीवनावर त्याचा मोठा प्रभाव होत असतो, कारण आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या पैलूंवर शुभ-अशुभ असा प्रभाव टाकत असतात. वर्ष 2022 मध्ये गुरू राशी परिवर्तन करणार आहे, ते 13 एप्रिल 2022 ला आपली राशी मीनमध्ये प्रवेश करतील. हे परिवर्तन चार राशींसाठी खूप फायदेकारक आहे.
कन्या (Virgo):
गुरू राशी परिवर्तनामुळे कन्या राशीच्या लोकांना मोठा धन लाभ होणार आहे. कामामध्ये यश मिळणार आहे. गुंतवणुकीमधूनही धन लाभ होणार आहे. इतकेच काय करिअरमध्येही प्रगती होणार आहे.
वृश्चिक (Scorpio):
या राशींच्या लोकांना गुरूचं परिवर्तन हे खूप लाभकारक आहे. या राशींच्या लोकांच्या करिअरमध्ये प्रगती होणार आहे. उत्पन्न वाढणार असून त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधार होणार आहे. पैसे कमाई करण्याचे नवे मार्ग मिळतील. व्यापाऱ्यांना बक्कळ फायदा होणार आहे.
धनु (Sagittarius):
धनु राशींच्या लोकांसाठीही गुरुचं स्थान बदलणं खूप फायद्याचं ठरणार आहे. कारण तुम्हाला माहिती असेल धनुचं राशीचा स्वामी हा गुरू आहे. यामुळे या राशींला जबरदस्त फायदा होणार आहे. प्रमोशन आणि पगारातील वाढ होण्याची शक्यता असून उत्पन्न वाढणार आहे. नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याची शक्यता आहे.
कुंभ राशींच्या लोकांना एप्रिल 2022 मध्ये आपले उत्पन्न वाढ झाल्याची जाणीव होईल. जॉब- बिझनेस या दोघांमध्ये लाभ होणार आहे. इतका पैसा कमावतील की भविष्यासाठी सहज गुंतवणूक करू शकतील. बेरोजगारांना मनाप्रमाणे नोकरी मिळेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ मराठी याची पुष्टी करत नाही.)