घरात हातातून पाच वस्तू पडणे समजले जाते अशुभ

inauspicious sings if these 5 things fall down from hand in house : ज्योतिषशास्त्रानुसार घरात असताना हातातून पाच वस्तू पडणे हे अशुभ समजले जाते. आपल्याला हे माहिती आहे का?

inauspicious sings if these 5 things fall down from hand in house
घरात हातातून पाच वस्तू पडणे समजले जाते अशुभ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • घरात हातातून पाच वस्तू पडणे समजले जाते अशुभ
  • आपल्याला हे माहिती आहे का?
  • जाणून घ्या...

inauspicious sings if these 5 things fall down from hand in house : अनेकदा घाईगडबडीत, कुठेतरी जाण्याची घाई असल्यामुळे अथवा विचारांच्या नादात हातातून वस्तू पडतात. घरात असताना असे प्रकार अनेकदा होतात. पण ज्योतिषशास्त्रानुसार घरात असताना हातातून पाच वस्तू पडणे हे अशुभ समजले जाते. आपल्याला हे माहिती आहे का? । निर्जला एकादशी

  1. मीठ पडणे : ज्योतिषशास्त्रानुसार घरात असताना हातातून मीठ किंवा मीठाने भरलेले भांडे पडणे अशुभ आहे. हे शुक्र आणि चंद्र कमकुवत असल्याचे लक्षण आहे. हा प्रकार आपल्या वैवाहिक आयुष्यात अडीअडचणी येणार असल्याचा संकेत समजला जातो. 
  2. तेल पडणे : ज्योतिषशास्त्रानुसार घरात असताना हातातून तेल किंवा तेलाने भरलेले भांडे पडणे अशुभ आहे. आपल्या आयुष्यात एखादी मोठी अडचण येणार असल्याचा हा संकेत आहे. आपल्या आर्थिक अडचणी वाढणार असल्याचाही हा संकेत समजला जातो.
  3. पूजेची थाळी पडणे :  ज्योतिषशास्त्रानुसार घरात असताना हातातून पूजेची थाळी पडणे अशुभ आहे. भविष्यातल्या मोठ्या अशुभाचा हा संकेत समजला जातो. कळत नकळत हातून झालेल्या चुकांमुळे देव आपल्यावर नाराज आहे असेही समजले जाते.
  4. अन्न सांडणे : ज्योतिषशास्त्रानुसार घरात असताना हातातून अन्न सांडणे किंवा अन्नाने भरलेले भांडे पडणे अशुभ आहे. आर्थिक अडचणी येणार असल्याचा हा संकेत समजला जातो. वास्तू दोषांमुळेही असा प्रकार घडण्याची शक्यता असते. 
  5. दूध सांडणे : ज्योतिषशास्त्रानुसार घरात असताना हातातून दूध सांडणे किंवा दुधाने भरलेले भांडे पडणे अशुभ आहे. चंद्र कमकुवत असल्याचा तसेच आर्थिक अडचणी येणार असल्याचा हा संकेत समजला जातो.

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी