Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाच्या तारखेबाबत गोंधळ झालाय? येथे जाणून घ्या शुभ मुहूर्त

आध्यात्म
Updated Aug 09, 2022 | 12:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

रक्षाबंधनाचा सण पोर्णिमेला साजरा केला जातो. या वर्षी पोर्णिमा तिथी दोन दिवस म्हणजेच ११-१२ ऑगस्टला आहे. अशातच रक्षाबंधनाच्या तारखेबाबत गोंधळ आहे. जाणून घ्या दोन्ही दिवस राखी बांधण्याचा मुहूर्त...

rakshabandhan
रक्षाबंधनाच्या तारखेबाबत गोंधळ झालाय? जाणून घ्या शुभ मुहूर्त 
थोडं पण कामाचं
  • रक्षाबंधन ११ ऑगस्ट २०२२ ला जे रक्षाबंधन साजरे करत आहेत ते प्रदोष काल रात्री ८.५२ मिनिटे ते रात्री ९.२० मिनिटांपर्यंत राखी बांधू शकतात.
  • ११ ऑगस्टला भद्रा काल सकाळपासून रात्रीपर्यंत असेल.
  • जर तुम्ही १२ ऑगस्टला राखी बांधत आहात तर शुभ मुहूर्तावर जरूर लक्ष द्या.

मुंबई: भावा-बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन(rakshabandhan). या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी(rakhi) बांधते आणि भाऊ बहिणीला तिच्या रक्षणाचे वचन देतो. यावेळेस भाऊ आपल्या बहिणीला छानसे गिफ्टही देतो.  म्हणण्यासाठी तर हा भावा-बहिणीचा उत्सव आहे मात्र हा साजरा करताना काही गोष्टींचे ध्यान राखणे गरजेचे आहे.Is there any confusion about date of rakshabandhan?

अधिक वाचा -  ईपीएफओ ​​पेन्शनच्या नियमात होणार मोठा बदल, पाहा नवीन नियम

श्रावण पोर्णिमा ११ ऑगस्ट २०२२ला सकाळी १० वाजून ३८ मिनिटांनी सुरू होईल आणि पुढील दिवशी १२ ऑगस्ट २०२२ला सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी संपेल. ११ ऑगस्टला भद्रा काल दिवसभर राहील. भद्राची समाप्ती रात्री ८.५१ ला होईल. अशातच काही जण १२ ऑगस्टला राखीपोर्णिमा साजरी करू शकतात. 

रक्षाबंधन ११ ऑगस्ट २०२२ ला जे रक्षाबंधन साजरे करत आहेत ते प्रदोष काल रात्री ८.५२ मिनिटे ते रात्री ९.२० मिनिटांपर्यंत राखी बांधू शकतात. या दिवशी राखी बांधण्यासाठी हा सगळ्यात उत्तम मुहूर्त आहे. 

११ ऑगस्टला भद्रा काल सकाळपासून रात्रीपर्यंत असेल. भद्र कालात राखी बांधणे अशुभ असते. मात्र काळाच्या अभावामुळे ज्या लोकांना या काळात राखी बांधायची आहे ते प्रदोषकालात शुभ, लाभ अथवा अमृत चौघडिया पाहूनन राखी बांधू शकतात. 

पोर्णिमा तिथीचे समापन १२ ऑगस्टच्या दिवशी ७.०५ मिनिटांनी होत आहे. या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ५ वाजून ५२ मिनिटांनी सुरू होत ७ वाजून ०५ मिनिटांपर्यंत असणार आहे. 

अधिक वाचा - पापाराझीसोबत भिडली तापसी पन्नू, नंतर हात जोडून म्हणते की...

जर तुम्ही १२ ऑगस्टला राखी बांधत आहात तर शुभ मुहूर्तावर जरूर लक्ष द्या. कारण या दिवशी पंचकही सुरू होत आहे. १२ ऑगस्ट २०२२ शुक्रवारी पंचकीची सुरूवात दुपारी २.४९ मिनिटांनी होणार असून जे १६ ऑगस्ट मंगळवारी रात्री ९.०७ वाजेपर्यंत असेल. 

बांधा तीन गाठी

रक्षाबंधनाच्या दिवशी जेव्हा बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा गाठ बांधताना काही गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. कारण तुम्ही राखी बांधताना विचार केला आहे का की किती गाठी बांधल्या पाहिजेत. काहींना याबाबत माहिती असेल मात्र काहींना नाही. राखी बांधताना नेहमी राखीच्या तीन गाठी बांधल्या पाहिजेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी