kaal bhairava Aarati lyrics in Marathi :  काल भैरव मराठी आरती, मंत्र आणि अष्टक 

jai dev bhairavnatha bhairavnathachi aarti : भगवान शिवाच्या उग्र रूपाला कालभैरव म्हणतात. यावर्षी 27 नोव्हेंबरला शनिवार, कालभैरव जयंती आहे.

jai dev bhairavnatha bhairavnathachi aarti  mantra Kaal Bhairava Ashtakam kaal bhairava Aarati lyrics in Marathi
काल भैरव आरती, मंत्र आणि अष्टक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • यावर्षी 27 नोव्हेंबरला शनिवार, कालभैरव जयंती आहे.
  • या पवित्र दिवशी कालभैरवाची उपासना केल्याने दुःख आणि वेदनांपासून मुक्ती मिळते
  • धार्मिक कथांनुसार काल भैरवाचा जन्म याच दिवशी झाला होता

kala bhairava jayanti 2021 : दरवर्षी काल भैरव जयंती मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरी केली जाते. धार्मिक कथांनुसार काल भैरवाचा जन्म याच दिवशी झाला होता. भगवान शिवाच्या उग्र रूपाला कालभैरव म्हणतात. यावर्षी 27 नोव्हेंबरला शनिवार, कालभैरव जयंती आहे. या पवित्र दिवशी कालभैरवाची उपासना केल्याने दुःख आणि वेदनांपासून मुक्ती मिळते आणि भय दूर होते. जाणून घेऊया काल भैरव आरती, मंत्र आणि काल भैरव अष्टक (kaal bhairav  mantra Kaal Bhairava Ashtakam kaal bhairava Aarati lyrics in Marathi)

काल भैरव आरती 

आरती ओवाळू भावें, श्री काळभैरावाला ||
दिनदयाळा भक्तवत्सला, प्रसन्न हो मजला ||
देवा, प्रसन्न हो मजला || धृ ||

धन्य तुझा अवतार जागी, या रौद्ररुपधारी |
उग्र भयंकर भव्य मुर्ति, परि भक्तांसी तारी |
काशीक्षेत्री वास तुझा, तू तिथला अधिकार |
तुझिया नामस्मरणे, पळती पिशाच्चादि भारी ||
पळती पिशाच्चादि भारी || आरती .....|| १ ||

उपासकां वरदायक होसी, ऐसी तव कीर्ती |
क्षुद्र जीव मी अपराधांना, माझ्या नच गणती |
क्षमा करावी, कृपा असावी, सदैव मजवरती |
मिलींदमाधव म्हणे देवा, घडो तुझी भक्ती ||
देवा घडो तुझी भक्ती || आरती .... || २ ||

काल भैरव मंत्र

ओम कालभैरवाय नम:। ओम ह्रीं बं बटुकाय आपदुद्धारणाय कुरूकुरू बटुकाय ह्रीं। ओम भ्रं कालभैरवाय फट्। जय भैरव देवा, प्रभु जय भैंरव देवा।

काल भैरव अष्टक

देवराजसेव्यमानपावनांघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् ।
नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ १॥

भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् ।
कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ २॥

शूलटंकपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् ।
भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ३॥

भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम् ।
विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे॥ ४॥

धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशनं कर्मपाशमोचकं सुशर्मधायकं विभुम् ।
स्वर्णवर्णशेषपाशशोभितांगमण्डलं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ५॥

रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरंजनम् ।
मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ६॥

अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसंततिं दृष्टिपात्तनष्टपापजालमुग्रशासनम् ।
अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ७॥

भूतसंघनायकं विशालकीर्तिदायकं काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम् ।
नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे ॥ ८॥

॥ फल श्रुति॥

कालभैरवाष्टकं पठंति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम् ।
शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं प्रयान्ति कालभैरवांघ्रिसन्निधिं नरा ध्रुवम् ॥

॥इति कालभैरवाष्टकम् संपूर्णम् ॥

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी