Jaya Ekadashi 2023 Date And Time, Jaya Ekadashi 2023 vrat and vrat katha : एकादशीचा दिवस हा भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय असलेला दिवस आहे. या दिवशी मनापासून विष्णू देवाचे नामस्मरण केले, विष्णू देवाची पूजा केली तर पापांमधून मुक्ती मिळते, पुण्य लाभते असे म्हणतात. मृत्यू पश्चात वैकुंठवासी होण्यासाठी एकादशीचे व्रत करावे असे सांगतात.
पंचांगानुसार बुधवार 1 फेब्रुवारी 2023 रोजी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी आहे. या एकादशीलाच जया एकादशी (Jaya Ekadashi) आणि पापनाशिनी एकादशी (Papnashini Ekadashi) या दोन नावांनी ओळखले जाते. जया एकादशी अर्थात पापनाशिनी एकादशीला मनापासून विष्णू देवाचे नामस्मरण केले, विष्णू देवाची पूजा केली तर पापांमधून मुक्ती मिळते, पुण्य लाभते. वाईट शक्तींपासून सुटका व्हावी तसेच वाईट शक्तींपासून संरक्षण मिळावे यासाठी या दिवशी विष्णू देवाचे नामस्मरण करतात तसेच विष्णूची पूजा करतात.
पंचांगानुसार बुधवार 1 फेब्रुवारी 2023 रोजी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी अर्थात जया एकादशी किंवा पापनाशिनी एकादशी आहे.
मंगळवार 31 जानेवारी 2023 रोजी रात्री 11 वाजून 54 मिनिटांपासून जया एकादशी या तिथीची सुरुवात होत आहे. जया एकादशी या तिथीची समाप्ती बुधवार 1 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 2 वाजून 1 मिनिटांनी होणार आहे.
जया एकादशीचे व्रत बुधवार 1 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी करावे
जया एकादशीच्या व्रताचे पारायण गुरुवार 2 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7.10 ते 9.19 या वेळेत करावे.
जया एकादशीच्या पूजेसाठी बुधवार 1 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 8.30 ते 9.30 दरम्यान शुभ मुहूर्त आहे.
एकादशी हा हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला (पंधरवड्यातला) अकरावा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातल्या दोन पंधरवड्यांत (पक्षांत) प्रत्येकी एक अशा प्रकारे दोन वेळा एकादशी येते. मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात महिन्यातला कृष्ण पक्ष शुक्ल पक्षाच्या आधी येत असल्याने कृष्ण पक्षात येणारी विशिष्ट नावाची एकादशी नंतरचे नाव असलेल्या महिन्यात येते. उदा : ज्या दिवशी महाराष्ट्रात आषाढ महिन्यातील कामिका एकादशी असते, त्यादिवशी मध्य प्रदेशात श्रावण महिन्यातली कामिका एकादशी असते. हा प्रकार शुक्ल एकादशींच्या बाबतीत होत नाही.
प्राचीन काळात नंदनवनात उत्सव साजरा होत होता. उत्सवात देवीदेवता, ऋषी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. उत्सवात संगीत आणि नृत्य सुरू होते. उत्सवात माल्यवान गंधर्व सहभागी झाला होता. तो सुंदर गायन करत होता आणि पुष्यवती नावाची नृत्यांगना नृत्य करत होती. थोड्या वेळाने माल्यवान गंधर्व आणि पुष्यवती नृत्यांगना एकमेकांकडे मोहीत झाले. मोहीत झाल्यामुळे नकळत माल्यवान गंधर्व गायनातील तर पुष्यवती नृत्यांगनेचे नृत्यातील लक्ष उडाले. ते दोघे भरकटले. या प्रकाराची माहिती मिळताच इंद्र देव संतापले. त्यांनी नेमून दिलेले कृत्य करण्यात कुचराई केल्याप्रकरणी माल्यवान गंधर्व आणि पुष्यवती नृत्यांगना या दोघांची स्वर्गातून हकालपट्टी केली. माल्यवान गंधर्व आणि पुष्यवती नृत्यांगना या दोघांना पृथ्वीवर पिशाच्च रुपाने राहण्याचा शाप देण्यात आला.
पिशाच्च योनीत माल्यवान गंधर्व आणि पुष्यवती नृत्यांगना त्यांच्या आयुष्यातील कठीण काळ व्यतीत करत होते. याच काळात जया एकादशी आली. जया एकादशीच्या दिवशी माल्यवान गंधर्व आणि पुष्यवती नृत्यांगना या दोघांनी दिवसभर उपवास केला. फक्त फलाहार करून दोघांनी केलेल्या चुकांसाठी माफी मागितली. पश्चाताप केला. दुसऱ्या दिवशी सकाळी बघतात तर माल्यवान गंधर्व आणि पुष्यवती नृत्यांगना या दोघांची पिशाच्च योनीतून मुक्तता झाली होती आणि ते पुन्हा एकदा मूळ रुपात आले होते. दोघांना परत स्वर्गात प्रवेश मिळाला. हे सर्व जया एकादशीला केलेल्या व्रतामुळे झाले. यामुळेच पापांमधून मुक्त होण्यासाठी पृथ्वीवर जया एकादशीचे व्रत करतात.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)
आजचे राशीभविष्य, जाणून घ्या आपले बुधवार 1 फेब्रुवारी 2023चे भविष्य (वेबस्टोरी)
Daan Tips: या वस्तूंचे चुकूनही नका करू दान, नाहीतर होतील वाईट परिणाम