Astro News । मुंबई : जूनचा महिना ज्योतिषशास्त्रानुसार खूप महत्त्वाचा असणार आहे. याचे कारण म्हणजे जून महिन्यात ५ महत्त्वाचे ग्रह स्थान बदलणार आहेत. यादरम्यान तीन महत्त्वाच्या ग्रहांचे संक्रमण होईल, तर दोन महत्त्वाच्या ग्रहांच्या स्थितीमध्ये परिवर्तन होईल. त्यामुळे देशातील आणि जगातील सर्वच लोकांच्या जीवनात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. यादरम्यान दोन महत्त्वाच्या ग्रहांचा शुभ योगायोगही तयार होत आहे, त्यामुळे त्याचाही परिणाम जाणवणार आहे. चला तर म जाणून घेऊया जून महिन्यात कोणत्या ग्रहांच्या स्थितीत आणि राशीमध्ये परिवर्तन होणार आहे. (June will be a very special month, people in this zodiac will have a lottery).
अधिक वाचा : रोज सकाळी उठल्यावर पोट साफ होत नसेल तर करा हे काम
जून महिन्यात बुध आणि शुक्र या ग्रहांची युतीही होत आहे. खरं तर एप्रिल महिन्यापासून बुध वृषभ राशीत विराजमान आहे आणि आता या राशीत शुक्र ग्रहाच्या प्रवेशामुळे बुध-शुक्र यांची युती तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध-शुक्र संयोगाने लक्ष्मी नारायण योग तयार होतो आणि या योगाला अतिशय शुभ योगाचा दर्जा देण्यात आला आहे. शुक्र आणि बुध हे दोन्ही नैसर्गिकरित्या शुभ, पवित्र आणि सात्विक ग्रह आहेत. बुध आणि शुक्र यांच्या युतीमुळे तयार होणारा लक्ष्मी नारायण योग व्यक्तीच्या धनात वाढ करतो. अशा परिस्थितीत व्यवसाय क्षेत्राशी संबंधित लोकांना या काळात चांगले आर्थिक धन मिळेल.
खासकरून वृषभ, सिंह आणि धनु राशीसाठी जून महिना शुभ आणि लाभदायक आहे. या तीन राशीच्या लोकांसाठी जून महिन्यात विशेष आर्थिक लाभ होईल. यासोबतच कार्यक्षेत्रात यश मिळेल आणि नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळेल. व्यापार्यांनाही नवीन डील्स आणि अनेक फायदे मिळतील. या व्यतिरिक्त या काळात कौटुंबिक संबंध दृढ होतील आणि प्रेमसंबंध मजबूत होतील.
डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.