Jupiter Transit: ज्योतिषशास्त्नानुसार मीन राशीत गुरूचा प्रवेश; या ४ राशींना वर्षभरासाठी प्रचंड आर्थिक लाभ

आध्यात्म
Updated Jun 11, 2022 | 11:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Jupiter Transit in Pisces । ज्योतिषशास्त्रात गुरु हा शुभ ग्रह मानला जातो. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील वैवाहिक जीवन, वैवाहिक सुख, मुले, शिक्षण, ज्ञान आणि संपत्ती यांचा तो कारक असतो.

Jupiter's entry in Pisces, financial benefits for these 4 zodiac signs throughout the year
मीन राशीत गुरूचा प्रवेश, या राशींना होणार प्रचंड लाभ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्योतिषशास्त्रात गुरु हा शुभ ग्रह मानला जातो.
  • गुरू ग्रहाचा मीन राशीत प्रवेश १३ एप्रिल २०२२ रोजी झाला आहे.
  • गुरूदेव या राशीत १ वर्ष विराजमान असणार आहेत.

Jupiter Transit in Pisces । मुंबई : ज्योतिषशास्त्रात गुरु हा शुभ ग्रह मानला जातो. कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील वैवाहिक जीवन, वैवाहिक सुख, मुले, शिक्षण, ज्ञान आणि संपत्ती यांचा तो कारक असतो. असे म्हणतात की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरूची स्थिती मजबूत असते, त्यांची आर्थिक स्थिती चांगली राहते. यासोबतच त्यांचे वैवाहिक जीवनही आनंदी राहते. ज्योतिषशास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते गुरु ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. लक्षणीय बाब म्हणजे गुरू ग्रहाचा मीन राशीत प्रवेश १३ एप्रिल २०२२ रोजी झाला आहे. गुरूदेव या राशीत १ वर्ष विराजमान असणार आहेत. (Jupiter's entry in Pisces, financial benefits for these 4 zodiac signs throughout the year). 

अधिक वाचा : पाकने वेस्टइंडिजविरूद्ध जिंकली सलग १० वी एकदिवसीय मालिका

या ४ राशींना वर्षभरासाठी प्रचंड आर्थिक लाभ

  1. कुंभ (Aquarius) - तज्ज्ञांच्या मते, गुरू मीन राशीत गेल्याने कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. तसेच कुठेतरी अडकलेले पैसे या काळात परत मिळू शकतात. व्यवसायात विस्ताराची संधी मिळेल. घर किंवा वाहन खरेदीची दाट शक्यता आहे. याशिवाय नोकरीत प्रमोशन होण्याची देखील शक्यता आहे. 
  2. तूळ (Libra) - तूळ राशीच्या लोकांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. सरकारी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरदार लोकांना या काळात विशेष आर्थिक लाभ मिळू शकतो. उत्पन्नात वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. यासोबतच व्यवसाय करणाऱ्या लोकांना अतिरिक्त नफा मिळू शकतो.
  3. वृश्चिक (Scorpio) - गुरूच्या संक्रमणाच्या एक वर्षाच्या कालावधीत तुमच्या संपत्तीत आणि उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. अनेक स्त्रोतांकडून आर्थिक लाभाची संधी मिळू शकते. व्यवसायात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात मानसन्मान मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. तुमच्या कामांसाठी तुम्हाला अतिरिक्त प्रोत्साहनपर पैसे मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय परदेशात शिक्षण आणि नोकरीची इच्छा पूर्ण होऊ शकते.
  4. कन्या (Virgo) - गुरु ग्रहाच्या संक्रमणादरम्यान कन्या राशीतील लोकांची जुन्या वादातून सुटका होऊ शकते. आर्थिक स्थिती सुधारू शकते. इतर कोणत्याही स्रोतातून पैसे मिळू शकतात. तसेच या काळात प्रवासातून पैसे मिळवण्याची संधी मिळू शकते. सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो.

डिस्क्लेमर : वरील दिलेल्या गोष्टी या पूर्वापारपासून सुरू असलेल्या मान्यता आहेत. त्यामुळे टाइम्स नाऊ मराठी या सर्वांचे समर्थन करत नाही. अनेकांच्या मान्यतांचा सन्मान करून वरील गोष्टी दिलेल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी