Karwa Chauth 2021 Upay: आज करवा चौथच्या दिवशी करा फक्त हे 2 उपाय, वैवाहिक जीवनातील अडचणी होतील दूर

आध्यात्म
भरत जाधव
Updated Oct 24, 2021 | 12:01 IST

अश्विन महिन्यात येणाऱ्या वद्य चतुर्थीला करवा चौथ व्रत आचरले जाते. अगदी शतकानुशतके ही परंपरा प्रचलित असल्याचे दिसते. करवा चौथचे व्रत प्रामुख्याने उत्तर भारतात विशेषत्वाने आचरले जाते.

Just do these two things on the karwa chauth day
आज करवा चौथच्या दिवशी करा फक्त हे 2 उपाय; दूर होतील अडचणी  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • कागदाच्या साहाय्याने नवरा-बायकोमधील मिटेल भांडण
  • पती-पत्नीचं प्रेम वाढविण्यासाठी करवा चौथ आहे महत्त्वाचा सण
  • करवा चौथला करक चतुर्थी, दशरथ चतुर्थी या नावानेही संबोधले जाते.

मुंबई : अश्विन महिन्यात येणाऱ्या वद्य चतुर्थीला करवा चौथ व्रत आचरले जाते. अगदी शतकानुशतके ही परंपरा प्रचलित असल्याचे दिसते. करवा चौथचे व्रत प्रामुख्याने उत्तर भारतात विशेषत्वाने आचरले जाते. वर्षभरात येणाऱ्या व्रत-वैकल्यांमध्ये करवा चौथला विशेष आणि वेगळे महत्त्व आहे. सुवासिनी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, यासाठी हे व्रत करतात. करवा चौथला करक चतुर्थी, दशरथ चतुर्थी या नावानेही संबोधले जाते. 

यावर्षी ही तिथी २४ ऑक्टोबर २०२१ रोजी आहे. या दिवशी महिला पूर्ण दिवस निर्जला व्रत ठेवत सायंकाळी पूजा करतात. रात्री चंद्राच्या दर्शन घेतल्यानंतर पती आपल्या हाताने पत्नीला पाणी पाजत असतात. यामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढत असते शिवाय त्यागाची भावना वाढत असते. दरम्यान जर नवरा-बायकोमधील नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला असेल, वाद होत असतील तर आज करवा चौथच्या दिवशी काही खास उपाय करुन या समस्या तुम्ही दूर करू शकतात. 

वैवाहिक जीवनातील समस्या अशा प्रकारे सोडवा:

करवा चौथच्या दिवशी आपली समस्या एका कागदावर आणि दुसऱ्या कागदावर आपल्याला हव्या असलेल्या समस्येचे समाधान लिहा. या दोन कागदांसह, करवा चौथच्या दिवशी अशा मंदिरात जा जिथे संपूर्ण शिव परिवाराची मूर्ती बसवली जाते. यानंतर, दोन्ही कागदे बंद करा आणि ती भगवान शिवाच्या चरणी अर्पण करा. त्यानंतर भगवान शिव आणि त्यांच्या कुटुंबीयांची विधिपूर्वक पूजा करा. तुमची समस्या दूर करण्यासाठी तुमच्या मनात प्रार्थना करा. त्यानंतर समस्या लिहिलेला कागद तिथेच सोडून समस्यांचे उपाय लिहिलेला कागद सोबत आणा. लक्ष द्या हा उपाय करताना तुम्हाला कोणी पहणार नाही याची काळजी घ्या.  

या उपायाने नातेसंबंधात प्रेम राहील अबाधित :

जर पती-पत्नीमधील प्रेम कमी होऊ लागले असेल, तर करवा चौथच्या दिवशी लाल कागदावर सोनेरी अक्षरांनी तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाव लिहा. यानंतर, या लाल रंगाच्या रेशमी कापडात 50 ग्रॅम पिवळी मोहरी आणि दोन गोमती चक्र ठेवून एक गठ्ठा बनवा. आता हा गठ्ठा अशा ठिकाणी ठेवा की पुन्हा पुन्हा कोणाला दिसणार नाही. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही करवा चौथ व्रत ठेवाल, तेव्हा दुसऱ्या दिवशी हा गठ्ठा वाहत्या पाण्यात सोडून द्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी