Jyotish Shastra: घरात सदैव कृपा राहावी आणि कुटुंबाला (family) कधीही आर्थिक संकटांना (Financial crisis) सामोरे जावे लागू नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासंदर्भात ज्योतिषशास्त्रात (astrology) काही महत्त्वाच्या गोष्टीही सांगण्यात आल्या आहेत. ज्योतिष शास्त्राच्या टिप्सनुसार किचनमध्ये (Kitchen) ठेवलेल्या काही गोष्टी तुमचे नशीब बदलू शकतात. जर या वस्तू उधार दिल्याने तुमच्या घराची समृद्धी थांबू शकते. चला जाणून घेऊया की, अशा काही गोष्टी आहेत ज्या विसरुनही उधार देऊ नये.
सहसा, कधीकधी स्वयंपाकघरातील काही लहान गोष्टी संपतात आणि अशा परिस्थितीत आपण बाजारात जाण्याऐवजी शेजाऱ्याकडून ती वस्तू उधार घेतो. किंवा एखादा शेजारी आपल्याकडून स्वयंपाकघरातील काही वस्तू उधार घेत असतो. जे वास्तूनुसार चुकीचे आहे आणि जर तुम्ही स्वयंपाक घरातील गोष्टी आपण कोणाला उसण्या दिल्या तर घराच्या सुख-समृद्धीवर नकारात्मक परिणाम होतो.
Read Also : शिंदे सरकारचा विस्तार; शिंदे गटाला 40 टक्के वाटा
हिंदू धर्मात हळद अतिशय शुभ आणि लाभदायक मानली जाते. हळदीचा वापर बहुतेक शुभ कार्यात केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचा थेट संबंध गुरु ग्रहाशी आहे. त्यामुळे कधीही चुकूनही हळद कोणालाही उधारीवर देऊ नये. असे केल्याने तुम्हाला करिअरसह वैवाहिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
Read Also : भारदार गुरदीप सिंगची दमदार कमाई, पटकवलं कांस्य पदक
मीठ पडणे अशुभ आहे हे बहुतेक लोकांना माहित असेल, परंतु तुम्हाला माहित आहे का की मीठ कधीही उधारीवर देऊ नये. कोणाच्या घरातील मीठ संपले असेल तर उधारी मागण्याऐवजी बाजारातून मीठ विकत घ्या. किंवा कोणी मागत असेल तर त्याला थेट नकार द्या. ज्योतिष शास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील मीठ कधीही संपू नये आणि कोणालाही मीठ देऊ नये. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
Read Also : टीईटी परीक्षा घोटाळा; ७ हजार उमेदवारांना कायमची परीक्षा बंदी
ज्योतिष शास्त्रानुसार दुधाचा थेट संबंध चंद्र ग्रहाशी मानला जातो आणि त्यामुळे दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ कोणालाही उधार देणे शुभ मानले जात नाही. विशेषतः सूर्यास्तानंतर कोणालाही दूध उसने देऊ नये.
ज्योतिष शास्त्रानुसार लसूण कांदा केतू ग्रहाशी संबंधित असून त्यांचे व्यवहार केल्याने घरातील समृद्धी थांबते. संध्याकाळी विसरूनही लसूण-कांदा कुणाला देऊ नये, असं म्हटलं जातं.
डिस्क्लेमर: येथे दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे. टाइम्स नाउ याची पुष्टी करत नाही.