कोणाच्याही हातावर नका ठेवू या गोष्टी, होईल प्रचंड नुकसान

jyotish shastra do not keep these things on anyone palm and hand all the deposits of the house will end : ज्योतिषशास्त्रानुसार काही कृती या शुभ असतात तर काही कृती अशुभ असतात. अनेकांना ज्योतिषशास्त्रातील शुभ अशुभ याबाबतची पुरेशी माहिती नसेत. यामुळे नकळतपणे काही वेळा हातून चूक होते आणि त्यामुळे नुकसान होते.

jyotish shastra do not keep these things on anyone palm and hand all the deposits of the house will end
कोणाच्याही हातावर नका ठेवू या गोष्टी, होईल प्रचंड नुकसान  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कोणाच्याही हातावर नका ठेवू या गोष्टी, होईल प्रचंड नुकसान
  • ज्योतिषशास्त्रानुसार हातात या गोष्टी देणे असते अशुभ
  • कोणत्या कृती अशुभ आहेत ते समजून घ्या आणि अशुभ कृती करणे टाळा

jyotish shastra do not keep these things on anyone palm and hand all the deposits of the house will end : ज्योतिषशास्त्रानुसार काही कृती या शुभ असतात तर काही कृती अशुभ असतात. अनेकांना ज्योतिषशास्त्रातील शुभ अशुभ याबाबतची पुरेशी माहिती नसेत. यामुळे नकळतपणे काही वेळा हातून चूक होते आणि त्यामुळे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या कृती अशुभ आहेत ते समजून घ्या आणि अशुभ कृती करणे टाळा. 

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

ज्योतिषशास्त्रानुसार हातात या गोष्टी देणे असते अशुभ

  1. ज्योतिषशास्त्रानुसार कोणाच्याही हातात मीठ देणे अशुभ समजले जाते. मीठ एखाद्या भांड्यात घालून द्यावे. पण थेट हातात मीठ ठेवू नये. मीठ हातात ठेवले तर वाद होण्याची शक्यता असते.
  2. ज्योतिषशास्त्रानुसार पिण्यासाठी पाणी थेट ओंजळीत ओतण्याऐवजी एखाद्या पेल्यात (ग्लास) द्यावे. पाणी थेट ओंजळीत दिल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. 
  3. ज्योतिषशास्त्रानुसार मिरची किंवा मिरची पूड थेट हातात देण्याऐवजी एखाद्या भांड्यात घालून द्यावी. मिरची किंवा मिरची पूड थेट हातात दिल्यास वाद होण्याची शक्यता असते.
  4. ज्योतिषशास्त्रानुसार पोळी (चपाती किंवा रोटी), भाकरी किंवा इतर कोणताही खाण्याचा पदार्थ हा थेट हातात देण्याऐवजी एखाद्या भांड्यात घालून द्यावा. खाण्याचा पदार्थ थेट हातात दिल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. 
  5. ज्योतिषशास्त्रानुसार मागितला तरी रुमाल थेट कोणाच्या हातात देऊ नये. रुमाल संबंधित व्यक्तीच्या शेजारी ठेवावा आणि मग त्याला तो उचलून घेऊ द्यावा. रुमाल थेट हातात दिल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी