Shopping tips before buy anything: हिंदू धर्मात प्रत्येक कामासाठी दिवस, वेळ आणि मुहूर्ताला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही नव्या वस्तूची खरेदी करताना शुभ मुहूर्त पाहूनच खरेदी केली जाते. शुभ मुहूर्तावर खरेदी केलेली वस्तू घरात आल्यास त्याचे सकारात्मक परिणाम होतात असे मानले जाते. घरातील लहान वस्तूंपासून ते मोठ्या वस्तूंपर्यंत सर्व गोष्टी वेळेनुसार ठरवल्या जातात. शुभ मुहूर्तावर वस्तू खरेदी न केल्यास घरात नकारात्मकता येते असे मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, आठवड्यातील सात दिवस हे कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी, देवाशी संबंधित असतात. ज्योतिष शास्त्रानुसार, एखाद्या शुभ दिवसानुसार वस्तू खरेदी केल्यास ते शुभ मानले जाते. जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणती वस्तू खरेदी करणं शुभ मानले जाते. (Jyotish shastra tips in marathi know which day is auspicious and inauspicious to buy)
सोमवार : सोमवार हा चंद्र आणि भगवान शिव यांचा दिवस आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी दूध, तांदूळ, मिठाई आणि खवा खरेदी करता येतो. या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करू नयेत.
अधिक वाचा : Samudra Shastra: शरीराचे अवयव फडफडणे, थरथरणे देतात शुभ आणि अशुभाचे संकेत : जाणून घ्या काय आहेत हे संकेत
मंगळवार - मंगळवार हा हनुमानाचा दिवस मानला जातो. या दिवशी जमीन, घराची खरेदी-विक्री शुभ मानली जाते. या दिवशी लाकूड आणि चामड्यापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नयेत.
बुधवार - बुधवार हा बुध देवता आणि गणेशाला समर्पित आहे. या दिवशी घराच्या सजावटीच्या वस्तू, विज्ञानाच्या संबंधित पुस्तके, स्टेशनरीच्या वस्तू खरेदी करणे चांगले मानले जाते. या दिवशी नवीन भांडी आणि तांदूळ खरेदी करणे टाळा.
अधिक वाचा : Shukra Gochar:गणेश चतुर्थीला शुक्र बदलेल राशी, या 3 राशींचे भाग्य खुलणार
गुरुवार - हा वार श्री विष्णू यांचा शुभ दिवस आहे. या दिवशी नवीन मालमत्ता आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी टोकदार वस्तू आणि कपडे खरेदी करू नयेत.
शुक्रवार - शुक्रवार हा ग्रह आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवसापासून मेकअपच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. परंतु या दिवशी पूजेचे साहित्य, घर, जमीन खरेदी करणे टाळावे.
शनिवार - या दिवशी तेल, लोखंड, लाकूड, मीठ, झाडू, मसाले आणि चामड्याच्या वस्तू खरेदी करू नयेत. या दिवशी दागिने, चांदी, हिरे, सोने, पन्ना, नीलम खरेदी करणे शुभ असते.
रविवार - रविवार हा सूर्यदेवाचा दिवस आहे. या दिवशी तांब्याच्या वस्तू, गहू, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि कात्री खरेदी करणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर या दिवशी मोहरीचे तेल, लोखंडी वस्तू आणि वाहन खरेदी करू नयेत.
(Disclaimer: हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे लिहिण्यात आलेला आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)