घोड्याची नाल करेल कमाल, जाणून घ्या घराच्या कोणत्या कोपऱ्यात नाल लावल्यास होईल फायदा

jyotish upay horseshoe removes all the problems from life know the benefits Read in Marathi : घरात विशिष्ट दिशेला विशिष्ट पद्धतीने घोड्याची नाल लावून ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होऊ शकते. 

horseshoe removes all the problems from life
घोड्याची नाल करेल कमाल  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • घोड्याची नाल करेल कमाल
 • जाणून घ्या घराच्या कोणत्या कोपऱ्यात नाल लावल्यास होईल फायदा
 • घरात विशिष्ट दिशेला विशिष्ट पद्धतीने घोड्याची नाल लावून ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होऊ शकते

jyotish upay horseshoe removes all the problems from life know the benefits Read in Marathi : प्रत्येकाला आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदावी असे वाटते. आपली आर्थिक स्थित मजबूत व्हावी आणि आपण कायम आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत राहावे असेही प्रत्येकाला वाटते. आर्थिक संपन्नतेसाठी नागरिक वेगवेगळ्या व्यक्तींनी सांगितलेले वेगवेगळे उपाय करतात. अपेक्षित परिणाम मिळत नाही म्हणून निराश होतात. कारण आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असते. घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट झाला आणि सकारात्मक ऊर्जा वाढली तर आपली सुख शांती आणि समृद्धीची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. आपण आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ शकता तसेच निरोगी आणि आनंदी राहू शकता. पण नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात असेल तर अनेकदा असे दिसून येते की, संपन्नता आली तरी त्या संपन्नतेसोबत काही दुःख येतात. यासाठीच त्रास टाळण्यासाठी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करणे आवश्यक आहे. 

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी एक सोपा उपाय करता येईल. यासाठी घोड्याची नाल वापरावी लागेल. घरात विशिष्ट दिशेला विशिष्ट पद्धतीने घोड्याची नाल लावून ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होऊ शकते. 

कशी लावावी घोड्याची नाल?

 1. बाजारातून घोड्याची नाल खरेदी करा किंवा लोहाराकडून घोड्याची नाल पैसे देऊन तयार करून घ्या.
 2. ब्राह्म मुहूर्तावर उठून आंघोळ करा. घोड्याची नाल हातात घ्या आणि गंगाजल वापरून अर्थात पवित्र पाण्याचा वापर करून धुऊन घ्या.
 3. धुतल्यामुळे ओली झालेली घोड्याची नाल सूर्यप्रकाशात सुकवून कोरडी करा.
 4. आता घोड्याच्या नालेत भरपूर सकारात्मक ऊर्जेचा संचार झाला आहे. 
 5. घोड्याची नाल जवळच्या लक्ष्मी मंदिरात न्या देवीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवा. देवीला मनोभावे नमस्कार करा. 
 6. कुंकू आणि तांदूळाचे दाणे लावून घोड्याच्या नालेची पूजा करा.
 7. घोड्याच्या नालेला काळा धागा (काळी दोरी) बांधा.
 8. काळा धागा बांधलेली घोड्याची नाल घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला बांधून ठेवा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल.
 9. घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल. घरातील सदस्यांचे आर्थिक प्रश्न दूर होतील. घरात आर्थिक संपन्नात येईल. घरातील कोणत्याही सदस्यावर शनि ग्रहाचा प्रभाव असेल तर तो दूर होण्यास मदत होईल. घरातील एखाद्या सदस्यावर वाईट शक्तीचा प्रभाव असल्यास तो दूर होईल. 

लक्षात ठेवा शनि देव प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्यांवर प्रसन्न होतात. यामुळे घासून गुळगुळीत झालेली घोड्याची नाल घरात सकारात्मक ऊर्जा वाढावी यासाठी वापरण्याला महत्त्व आहे. जर एखादा घोड खूप धावत असेल तर त्याच्या पायाच्या खुरांना लावलेली नाल घासली जाऊन चपटी आणि गुळगुळीत होते. यामुळे चपटी गुळगुळीत नाल मिळाली तर ती जरूर घरात पूर्वेला किंवा उत्तरेला लावा. यामुळे शनिदृष्टीची कृपादृष्टी राहण्यासाठी घोड्याच्या नालेचा वापर करता येईल. काळ्या घोड्याची वारंवार वापरली गेल्यामुळे घासून गुळगुळीत झालेली जास्त लाभदायी असते असे सांगतात. फक्त इंग्रजी यू आकारासारखी दिसते म्हणून घोड्याची नाल खरेदी करण्याने जास्त फायदा होत नाही. पण काळ्या रंगाच्या घोड्याची नाल माणसाच्या भाग्योदयासाठी उपयुक्त आहे.  

डिस्क्लेमर / Disclaimer : मजकूर संकलित माहितीच्याआधारे तयार केला आहे. टाइम्स नाउ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू  इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते अधिक महितीसाठी तज्ज्ञांची मदत घेऊ शकतात. टाइम्स नाउ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी