Importance of Kalubai Devi temple Yatra 2023: जाणून घ्या नवसाला पावणाऱ्या काळूबाई मातेचं महत्त्व अन् रंजक कथा, सिंधिया घराण्याने ग्वाल्हेरला का स्थापित केलं प्रतिरुप

आध्यात्म
भरत जाधव
Updated Jan 06, 2023 | 12:40 IST

Kalubai Devi Mandir Yatra 2023:महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील मांढरदेव (Mandhardevi) येथील श्रीकाळेश्वरी उर्फ काळूबाईची (Kalubai Devi)वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते. या यात्रेत भाविक आपल्या डोक्यावर देवी ठेवून वाजत-गाजत मंदिरात जात असतात.

Kalubai Devi Mandir Yatra 2023
जाणून घ्या काळूबाई देवीची रंजक कथा  |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • काळूबाई देवीचे मंदिर हे हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले आहे.
  • पौष महिन्यातील पोर्णिमेला या मांढरा गडावर यात्रा भरत असते.
  • देवीने पौष पौर्णिमेला रात्री दैत्याचा वध केला आणि विजय मिळवला होता.

Kalubai Devi Mandir Yatra 2023:महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील मांढरदेव (Mandhardevi) येथील श्रीकाळेश्वरी उर्फ काळूबाईची (Kalubai Devi)वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते. या यात्रेत भाविक आपल्या डोक्यावर देवी ठेवून वाजत-गाजत मंदिरात जात असतात. महाराष्ट्रातील सातारा (Satara)जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव (Madhardevi)येथील श्रीकाळेश्वरी म्हणजेच काळूबाई ही देवी नवसाला पावणारी देवी मानली जाते. मांढरगडावरील काळूबाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविक या यात्रेच्या वेळी येत असतात.  (Kalubai Devi Mandir Yatra 2023:10 Importance od Kalubai Devi Temple in Marathi)

अधिक वाचा  : भारतीय रेल्वेत परीक्षा न देता थेट नोकरी,10वी पास करा Apply

वाई भोर खंडाळाच्या शिखरावर देवीचे वास्तव आहे. या मंदिराच्या शेजारी म्हसोबाचे देवस्थान देखील आहे. काळूबाई देवीचे मंदिर हे हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आले आहे. या मंदिरात काळूबाई देवीची मूर्ती स्वयंभू चतुर्भुजी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये चांदीचे काम करण्यात आले आहे. तर देवीच्या हातात शस्त्र आहेत. एका हातातत त्रिशूल, तलवार आहे तर डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान धरलेली आहे. उद्या होणारी पौष महिन्यातील पोर्णिमेला या मांढरा गडावर यात्रा भरत असते. यादिवशी देवीच्या चेहऱ्यावर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवण्यात येतो. 

पौष महिन्यात का भरते यात्रा 

देवीने पौष पौर्णिमेला रात्री दैत्याचा वध केला आणि विजय मिळवला. त्यामुळेच पौष पौर्णिमेला देवीआईची मोठी यात्रा भरते. एक आख्यायिका आहे की सत युगात मांढव्य ऋषी गडावर यज्ञ करताना त्यांना लाख्यासुर नावाचा दैत्य त्रास देत होता. यज्ञ कार्यास सिद्धी मिळावी यासाठी मांढव्य ऋषींनी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली महादेवाने प्रसन्न होऊन पार्वतीची उपासना करण्यास सांगितले.

अधिक वाचा  : सहाव्या दिवशीही लोकांना आहे रितेशच्या सिनेमाचे 'वेड'

देवी पार्वतीने त्याच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन दैत्याचा संहार करण्यासाठी अवतार घेईन असे सांगितले आणि दैत्यावधासाठी देवी कैलासातून मांढरगडावर आली. लाख्यासुराला महादेवाचे वरदान मिळाले होते की त्याचे वध दिवसात करणे शक्य नव्हते. त्यामुळे देवी आईने लाख्यासुराचे वध रात्रीच्या वेळी करण्याचे ठरवले आणि पौष पौर्णिमेच्या रात्री युद्ध करून लाख्यासुराचा मध्यरात्री वध केला.

अधिक वाचा  : मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा, WhatsApp Facebook messages

मध्यप्रदेशातील सिंधिया घराण्याशी आहे खास संबंध 

सिंधिया घराण्याच्या कुलदेवीची पूजा मांढरे देवीच्या सिद्धपीठाच्या रूपात केली जाते. सिंधिया कुटुंबावर मांढरा देवीची विशेष कृपा दिसते. सिंधिया कुटुंबियांना स्वप्न दाखवून त्यांना प्रत्येक धोक्यापूर्वी सावध करते. सिंधिया शासकांनी सातरामधील काळूबाई देवीला मध्यप्रदेशात नेले होते. सिंधिया घराण्यातील जयाजीराव सिंधिया यांनी त्यांचे लष्करी कर्नल आनंदराव मांढरे यांच्या विनंतीवरून महाकालीची मूर्ती महाराष्ट्रातून आणून ग्वाल्हेरच्या कॅन्सर टेकडीवर स्थापित केली. आनंदराव मांढरे यांच्या वंशजांनी या मंदिराची पूजा केली आहे. आजही आनंदराव मांढरे यांचे वंशज या मंदिरात पुजारी म्हणून काम करतात. 

सिंधिया महालाचे गेट आणि मंढरा देवीच्या मंदिराचे गेट समोरा-समोर आहे. माहितीकार सांगतात की, सिंधिया शासक दररोज दुर्बिणीद्वारे मंढराच्या देवीला भेट देत असत. मांढरा देवीला बघूनच त्यांचा दिवस सुरू व्हायचा. मंढरा देवी ही  सिंधिया कुटुंबातील कुलदेवी आहे. सिंधिया कुटुंबियांवर काही संकट येणार असेल तर काळूबाई माता त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना संकटाविषयी ज्ञात करून देते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी