Kamika Ekadashi 2022: कामिका एकादशीच्या दिवशी बनतोय द्विपुष्कर योग, या दिवशी पूजा केल्यास मिळेल दुहेरी फळ

आध्यात्म
भरत जाधव
Updated Jul 21, 2022 | 08:05 IST

प्रत्येक महिन्याचे (Month) स्वतःचे महत्त्व आहे. भगवान शंकराच्या (Lord Shiva) पूजेसाठी (Worship) श्रावण महिना (Shravan Month) विशेष मानला जातो. या महिन्यात येणारे सर्व व्रत देखील विशेष आहेत. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी (Kamika Ekadashi) म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याचा नियम आहे.

Dwipushkar yoga is formed on Kamika Ekadashi day
कामिका एकादशीच्या दिवशी बनतोय द्विपुष्कर योग  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी म्हणतात.
  • या दिवशी व्रत पाळल्यास आणि मनापासून पूजा केल्यास व्यक्तीची सर्व पापे दूर होतात.
  • एकादशीच्या व्रतामध्ये प्रारायणचेही विशेष महत्त्व असते.

Sawan Ekadashi 2022 Date: प्रत्येक महिन्याचे (Month) स्वतःचे महत्त्व आहे. भगवान शंकराच्या (Lord Shiva) पूजेसाठी (Worship) श्रावण महिना (Shravan Month) विशेष मानला जातो. या महिन्यात येणारे सर्व व्रत देखील विशेष आहेत. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका एकादशी (Kamika Ekadashi) म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याचा नियम आहे. असे मानले जाते की या दिवशी व्रत पाळल्यास आणि मनापासून पूजा केल्यास व्यक्तीची सर्व पापे दूर होतात. मृत्यूनंतर त्या व्यक्तीला जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो.

श्रावणातील पहिली एकादशी 24 जुलै रोजी रविवारी येत आहे. या दिवशी तीन शुभ योग तयार होत आहेत. हे तिन्ही योग उपासनेच्या दृष्टिकोनातून चांगले मानले जातात. असे मानले जाते की या योगांमध्ये पूजा केल्याने व्यक्तीला उपासनेचे दुप्पट फळ मिळते. या तीन योगांबद्दल आणि त्यांचे महत्त्व जाणून घेऊया.

कामिका एकादशी 2022 मुहूर्त

श्रावण महिन्यात येणारी एकादशी तिथी 23 जुलै, शनिवारी सकाळी 11.27 वाजता सुरू होईल. तर तारीख 24 जुलै रोजी दुपारी 01:45 वाजता समाप्त होईल. लगेच त्याचदिवशी 24 जुलै रोजी एकादशीचे व्रत ठेवण्यात येणार आहे. या दिवशी द्विपुष्कर योग 23 जुलै रोजी रात्री 10 वाजता सुरू होईल आणि 24 जुलै रोजी सकाळी 05:38 वाजता सुरू होईल. त्याचबरोबर वृद्धी योगाची निर्मिती सकाळपासून दुपारी 02:02 पर्यंत आहे आणि ध्रुव योग दुपारी 02:02 पासून सुरू होत आहे.

कामिका एकादशी व्रत प्रारायणची वेळ 

एकादशीच्या व्रतामध्ये पारणाचेही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. एकादशीचे व्रत नियमानुसार केले नाही तर व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, असे म्हटले जाते.  प्रारायणची वेळ 25 जुलै रोजी सकाळी 05:38 ते 08:22 पर्यंत आहे.

Read Also : कोण असतील देशाचे राष्ट्रपती सिन्हा की द्रौपदी मुर्मूं?

तिन्ही योगांचे महत्त्व

द्विपुष्कर योग-

ज्योतिष शास्त्रानुसार द्विपुष्कर योगात केलेले कार्य दुप्पट वाढते. या योगात मौल्यवान वस्तू खरेदी करणे शुभ असते असे सांगितले जाते.

वृद्धि योग-

शास्त्रानुसार या योगात पूजा केल्याने मिळणारे पुण्य वाढते. तसेच या योगात केलेले कार्यही वाढते.

Read Also : जाणून घ्या तुमच्यासाठी गुरुवार कसा असेल?

ध्रुव योग- 

या योगात कोणतेही स्थिर काम केल्याने यश मिळते असे मानले जाते. इमारत बांधणीसाठी हा योग चांगला मानला जातो.

कामिका एकादशीचे विशेष मंत्र

धार्मिक ग्रंथांनुसार, पापकर्मांपासून मुक्त होण्यासाठी एकादशीच्या उपवासापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. कामिका एकादशीचे व्रत करणारी व्यक्ती कधीच कुयोनीमध्ये जन्म घेत नाही.  असे मानले जाते की कामिका एकादशीचे व्रत भगवान विष्णूच्या मंत्राचा जप केल्याशिवाय पूर्ण होत नाही. या दिवशी श्री हरीच्या पूजेच्या वेळी या मंत्रांचा जप संपत्ती वाढीसाठी आणि दुःखांपासून मुक्तीसाठी करावा.

Read Also : ब्रिटनमध्ये प्रथमच पारा ४० अंशांच्या वर

पैसा मिळवण्याचा मंत्र

ॐ भूरिदा भूरि देहिनो, मा दभ्रं भूर्या भर। भूरि घेदिन्द्र दित्ससि।

ॐ भूरिदा त्यसि श्रुत: पुरूत्रा शूर वृत्रहन्। आ नो भजस्व राधसि।

विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी

श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेवाय।।
ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।
ॐ विष्णवे नम:।।

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याला दुजोरा देत नाही.) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी