आजपासून कार्तिक महिना सुरू: या महिन्यात करा तुळशीची पूजा; आर्थिक समुद्धी येईल तुमच्या घरी

आध्यात्म
भरत जाधव
Updated Oct 21, 2021 | 12:24 IST

हिंदू धर्मात ( Hindu Religion) कार्तिक (Kartik) महिन्यात केल्या जाणाऱ्या तुळशी (Tulsi) पूजेला विशेष महत्त्व आहे.

Kartik month starts from today
कार्तिक महिन्यात करा तुळशीची पूजा; येईल आर्थिक समुद्धी   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • कार्तिक महिना हा सर्वोत्तम महिन्यांपैकी एक मानला जातो.
  • जर तुमचे काम अडकले असेल, व्यवसायात नफा होत नसेल तर कार्तिक महिन्यात विधीपूर्वक तुळशीची पूजा करावी. तुमचे सर्व त्रास दूर होतील.
  • कार्तिक महिना 21 ऑक्टोबर म्हणजेच आजपासून सुरू झाला असून 19 नोव्हेंबरपर्यंत हा महिना चालू राहील.

नवी दिल्ली: हिंदू धर्मात ( Hindu Religion) कार्तिक (Kartik) महिन्यात केल्या जाणाऱ्या तुळशी (Tulsi) पूजेला विशेष महत्त्व आहे. तुळशीची पूजा (Tulsi worship) तशी वर्षभर केली जाते, परंतु असे म्हटले जाते की कार्तिक महिन्यात तुळशीसमोर दिवा लावल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. यावेळी कार्तिक महिना 21 ऑक्टोबर म्हणजेच आजपासून सुरू झाला असून 19 नोव्हेंबरपर्यंत हा महिना चालू राहील. असे मानले जाते की अनेक महिने दीर्घ झोपेत झोपलेले भगवान विष्णू या महिन्यात उठतात. कार्तिक महिन्यात तुळशीची नियमित पूजा करणे आणि दिवा लावण्याने भगवान विष्णूचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. पुराणात सांगितले आहे की ज्या घरात तुळशी आहे, त्या घरात यमदूत प्रवेश करत नाहीत.

 तुळशीचा विवाह शालिग्रामशी झाला होता, म्हणून असे म्हटले जाते की जे तुळशीची पूजा करतो त्याला देवाचे आशीर्वाद मिळतात. एका आख्यायिकेनुसार, भगवान विष्णूंनी तुळशीला वरदान दिले होते की माझी तुळशीबरोबर शालिग्रामच्या नावाने पूजा केली जाईल आणि तुळशीशिवाय माझी पूजा करणाऱ्या भक्तांकडून मी नैवेद्य किंवा त्याची पूजा स्वीकारणार नाही.

अशी पूजा करा

शास्त्रानुसार तुळशीभोवती एक खांब बनवावा आणि तो तोरणाने सजवावा. स्तंभांवर स्वस्तिक चिन्ह बनवावे. रांगोळीतून अष्टदल कमळाबरोबरच शंखचक्र आणि गायीच्या पाय बनवून चौफेर पूजा करावी. तुळशीचे प्रार्थना केल्यानंतर धूप, दिवा, रोली, सिंदूर, चंदन, नैवेद्य आणि कपडे अर्पण करावे. तुळशीभोवती दिवा लावा आणि विधीपूर्वक तिची पूजा करावी.

कार्तिक महिना हा सर्वोत्तम महिन्यांपैकी एक मानला जातो

शास्त्रांमध्ये वेद, नद्यांमध्ये गंगा आणि युगांमध्ये सत्ययुग हे सर्वोत्तम मानले गेले आहेत. त्याचप्रमाणे कार्तिक महिना देखील सर्वोत्तम महिना मानला जातो. असे मानले जाते की जर तुमचे काम अडकले असेल, व्यवसायात नफा होत नसेल तर तुम्ही कार्तिक महिन्यात विधीपूर्वक तुळशीची पूजा करावी. तुमचे सर्व त्रास दूर होतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी