या दिशेला मोरपीस ठेवल्याने मिळतात अनेक लाभ, जीवनात येतो आनंद

आध्यात्म
Updated Aug 15, 2022 | 13:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

Peacock feather :अनेकांच्या घरात मोरपींसाचा गुच्छ सजवून ठेवतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की मोरपंख कोणत्या दिशेला ठेवणे चांगले मानले जाते. नाही तर घ्या जाणून

peacock feather
या दिशेला मोरपीस ठेवल्याने मिळतात अनेक लाभ, जीवनात येतो आनंद 
थोडं पण कामाचं
  • लिव्हिंग रूममधील पूर्व दिशेला भिंतीवर मोरपीस लावले पाहिजे. 
  • विद्यार्थ्यांनी मोरपीस आपल्या पुस्तकात अथवा स्टडी टेबलवर ठेवले पाहिजे
  • कुंडलीत राहु दोष असल्यास उत्तर पश्चिम दिशेला मोरपीस ठेवले पाहिजे 

मुंबई: मोर(peacock) एक असा पक्षी आहे ज्याला पाहून मन प्रसन्न होते. जेव्हा मोर आपला पिसारा फुलवून नाचू लागतो तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे असते. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. याशिवाय मोराचे पीस(peacock feather) घरात ठेवणे अतिशय शुभ मानले जाते. अनेक घरांमध्ये तर लोक मोरपीसांचा गुच्छ ठेवतात. हा पक्षी इतर पक्ष्यांपेक्षा वेगळा आणि आकर्षक आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का की मोरपीस घराच्या कोणत्या दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. Keep peacock feather in this sides of house

अधिक वाचा - ४८ मुलांचा बाप आहे हा तरुण, पण लग्नासाठी मिळत नाही मुलगी

मोरपीस ठेवण्याची योग्य दिशा

मोरपीस नेहमी घराच्या पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. तुम्ही उत्तर-पश्चिम दिशेलाही ठेवू शकता. 

ज्या लोकांच्या कुंडलीत राहु दोष असतो त्यांनी उत्तर-पश्चिम दिशेला मोरपीस ठेवावे. यामुळे राहु दोष कमी होण्यास मदत होते.

विद्यार्थ्यांनी मोरपीस हे आपल्या पुस्तकात अथवा स्टडी टेबलवर ठेवले पाहिजे.यामुळे अभ्यासात मन लागते. 

लिव्हिंग रूममधील पूर्व दिशेच्या भिंतीवर मोरपीस सजवल्याने घरात सकारात्मकता वाढते. यामुळे घरात वाद होत नाहीत. 

मोरपीस हे बेडरूममध्येही ठेवले पाहिजे. यामुळे वैवाहिक जीवनात सुख-शांती राहते. तसेच आनंदाचे आगमन होते. 

मोरपीस ठेवल्याने वास्तुदोषही दूर होतात. यासाठी ८ छोट्या पीसांना एकत्र बांधून घराच्या उत्तर-पूर्व दिशेच्या भिंतीवर लावा. 

पीसांचा गुच्छ अशा जागी ठेवा जेथे सगळ्यांची नजर पडेल. यामुळे घरात सकारात्मता वाढते. 

जर तुमचे मूल हट्टी होत असेल, तर त्याला नियमितपणे मोराच्या पिसांनी बनवलेल्या पंख्याने वारा द्या किंवा मोराच्या पंखाच्या पाकळ्या तुमच्या पंख्यावरच चिकटवाव्यात.

अधिक वाचा - स्वातंत्र्यानंतर आठच वर्षात भारतात आला होता पहिला Computer

कुंडलीतील ग्रहदोषांसाठी

कुंडलीतील ग्रहदोषांसाठी तसेच त्यांचा दुष्परिणाम होऊ नये यासाठी  श्रावण महिन्यात मोर पिसाचा उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्हाला ज्या ग्रहाचा दोष आहे त्या ग्रहाचा 21 वेळा मंत्र जप करा आणि मोर पिसावर पाणी शिंपडा. नंतर हे मोर पीस पूजेच्या ठिकाणी ठेवा. तसचे ग्रहशांतीसाठी देवाची प्रार्थना करा. काही दिवसांतच तुम्हाला बदल जाणवतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी