Vastu Tips: तिजोरीत पैशांसोबत ठेवा 'या' वस्तू, झटक्यात बदलेल नशीब अन् होईल भरभराट

Vastu Tips in Marathi: वास्तूशास्त्रात पैसा मिळवण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. या उपयांनुसार, जर तुम्ही घरातील तिजोरीत काही गोष्टी ठेवल्या तर तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा कायम राहील.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

Vastu Tips for Money: वास्तूशास्त्रात पैसा मिळवण्याच्या संदर्भात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय अनेकजण मानतात सुद्धा आणि त्यानुसार उपाययोजना करतात. या उपयांनुसार, जर तुम्ही आपल्या तिजोरीत काही गोष्टी ठेवाल तर नेहमीच लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहील. इतकेच नाही तर घरातील तिजोरी सुद्धा नेहमी पैशांनी भरुन राहील. (keep these things in a locker with money after this good luck and prosperity will come vastu tips read in marathi)

असे मानले जाते की, हे उपाय केल्याने घरात सदैव धन आगमन होतं आणि कधीही पैशांची चणचण भासत नाही. जाणून घेऊयात कोणत्या गोष्टी आहेत ज्या घरातील तिजोरीत ठेवल्या तर धन आगमन होतं.

लक्ष्मी मातेच्या सोबतच भगवान कुबेर यांनाही पैशांचे देवता मानले जातात. अनेक श्रीमंत लोकांना धन कुबेर असंही म्हटलं जातं. जर तुम्ही आपल्या तिजोरीत भगवान कुबेराची मूर्ती ठेवाल तर तुम्हाला धनलाभ होईल. वास्तूशास्त्रात धन आकर्षित करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत.

हे पण वाचा : तासाभरात मासिक पाळी येण्यासाठी हे आहेत घरगुती उपाय

शिंपले

असे म्हटले जाते की, शिंपले हे एखाद्याचे नशीब उजळवण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. पैसा मिळवण्यासाठी आणि आकर्षित करण्यासाठी सात शिंपले एका लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवायला हव्यात. असे केल्याने लक्ष्मी माताची कृपा तुमच्यावर होते आणि धन आगमन होतं.

हे पण वाचा : Vastu Tips: इतरांच्या या 6 वस्तू वापरणं टाळा अन्यथा व्हाल कंगाल

आरसा

वास्तूशास्त्रानुसार, तिजोरी किंवा लॉकरमध्ये एक लहानसा आरसा ठेवावा. तिजोरीत आरसा ठेवणं शुभ मानले जाते. तिजोरीत आरसा अशा ठिकाणी ठेवा की तिजोरी उघडताच आरसा दिसेल आणि या आरशात तिजोरीतील सर्व वस्तू सुद्धा दिसतील.

हे पण वाचा : म्हणून स्वप्नात मृत नातेवाईक दिसतात

नव्या नोटा

नव्या नोटा तिजोरीत ठेवा आणि त्या नोटा कधीही तिजोरीतून बाहेर काढा. एखाद्या पूजा दरम्यान सापडलेली नाणी किंवा नोट हे तिजोरीत ठेवा.

हे तिजोरीत ठेवू नका

तिजोरी अशी जागा आहे जेथे तुम्ही मौल्यवान वस्तू ठेवता. लक्षात असू द्या की, ज्या ठिकाणी तुम्ही महागड्या आणि मौल्यवान अशा वस्तू ठेवल्या आहेत त्या ठिकाणी कोणतीही अशी वस्तू ठेवू नका जी तुम्ही वापरत नाही किंवा तुमच्यासाठी ती निरोपयोगी आहे. विविध फोटोज किंवा चावी हे तिजोरीत ठेवू नका.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी