Vastu Tips: घरात पितळेचा सिंह ठेवल्याने संकटे होतील दूर; जाणून घ्या योग्य दिशा आणि त्याचे फायदे

Vastu Tips In Marathi | वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या सर्व वस्तूंचा लोकांच्या जीवनावर शुभ आणि अशुभ प्रभाव पडत असतो. दरम्यान आज आपण पितळेच्या सिंहाबद्दल भाष्य करणार आहोत.

Keeping a brass lion in the house will take away the troubles
घरात पितळेचा सिंह ठेवल्याने संकटे होतील दूर, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • घरात पितळेचा सिंह ठेवल्याने संकटे होतील दूर.
  • पितळेचा सिंह घरात राहणाऱ्या लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करतो.
  • पितळेचा सिंह उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला ठेवला जातो.

Vastu Tips In Marathi | मुंबई : वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या सर्व वस्तूंचा लोकांच्या जीवनावर शुभ आणि अशुभ प्रभाव पडत असतो. दरम्यान आज आपण पितळेच्या सिंहाबद्दल भाष्य करणार आहोत. अनेकदा तुम्ही लोकांच्या घरात ठेवलेला पितळेचा सिंह पाहिला असेल. लक्षणीय बाब म्हणजे पितळेच्या सिंहाचा शुभ प्रभाव तुमच्या जीवनावर पडू शकतो, जर तो योग्य दिशेने आणि योग्य मार्गाने लावला तर याचा प्रभाव जाणवू शकतो. मात्र अनेकांच्या मनात प्रश्न असतो की पितळेचा सिंह नेमका कोणत्या दिशेला ठेवायचा. चला तर मग जाणून घेऊया हा सिंह कोणत्या दिशेला ठेवायचा आणि त्याचे फायदे. (Keeping a brass lion in the house will take away the troubles). 

अधिक वाचा : एकनाथ शिंदेंचा आनंद दिघे झाला असता - राणे

पितळेच्या सिंहाचे फायदे

वास्तुशास्त्रानुसार जर घरामध्ये पितळेचा सिंह ठेवला असेल तर असे करणे खूप शुभ मानले जाते. कारण पितळेचा सिंह घरात राहणाऱ्या लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करतो. तसेच यामुळे करिअर आणि व्यवसाय दोन्हीमध्ये प्रगती होऊ शकते. काही लोक आपल्या आत दडलेल्या भीतीमुळे इतरांना तोंड देऊ शकत नाहीत. अशा स्थितीत घरात पितळेचा सिंह आल्यास आत्मशक्ती मिळते आणि व्यक्ती निर्भयपणे इतरांना सामोरे जाऊ शकते.

देव गुरु बृहस्पतीचा वास

सिंह हा पितळ धातूचा असल्यामुळे त्यात देव गुरु बृहस्पती वास करतात असे म्हणतात. याच कारणामुळे ज्याच्या कुंडलीत गुरु कमजोर आहे, ते आपल्या घरात पितळेची सिंहाची मूर्ती आणू शकतात. 

पितळेच्या सिंहाला कोणत्या दिशेला ठेवावे

प्रामुख्याने पितळेचा सिंह उत्तर-पूर्व किंवा पूर्व दिशेला ठेवला जातो. मात्र लक्षणीय बाब म्हणजे तुम्ही तुमच्या घरात पितळेचा सिंह ठेवता तेव्हा त्याचा चेहरा घराच्या मध्यभागी असावा. याशिवाय पितळी सिंहावर धूळ, माती किंवा घाण असू नये. अन्यथा त्याचा अशुभ प्रभाव तुमच्या आयुष्यावर वाढू शकतो. पितळेचा सिंह ठेवला की तो त्याच्या जागेवरून हलवू नये.

पितळेच्या सिहामुळे होणारे नुकसान

पितळेचा सिंह केवळ आत्मविश्वासच वाढवत नाही तर तुमची आर्थिक प्रगती देखील करू शकतो. पण पितळेच्या सिंहामुळे आर्थिक त्रास आणि बदनामीही होऊ शकते. अशा स्थितीत घरात पितळेचा सिंह बसवताना तज्ञांकडून योग्य दिशेचे ज्ञान घेणे आवश्यक आहे. तसेच घराच्या मध्यभागी माहिती असणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी