Vastu Tips: घरात अशा प्रकारे ठेवा क्रिस्टल कासव; बनाल अफाट संपत्तीचे मालक

आध्यात्म
Updated Jun 17, 2022 | 09:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vastu Tips In Marathi | वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये क्रिस्टल कासव ठेवणे खूप शुभ मानले जाते. हिंदू धर्मानुसार कासवाला विष्णूचा अवतार म्हटले जाते. विष्णूच्या १० अवतारांमध्ये त्याचा समावेश आहे. तर कासव देखील समुद्रमंथनातून बाहेर आले होते.

Keeping a crystal turtle in the house like this leads to economic progress
घरात अशा प्रकारे ठेवा क्रिस्टल कासव, येईल अफाट संपत्ती   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये क्रिस्टल कासव ठेवणे खूप शुभ मानले जाते.
  • हिंदू धर्मानुसार कासवाला विष्णूचा अवतार म्हटले जाते.
  • घराच्या मंदिरात पिवळ्या कापडामध्ये क्रिस्टल कासव ठेवा.

Vastu Tips In Marathi | मुंबई : वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये क्रिस्टल कासव (Crystal Turtle) ठेवणे खूप शुभ मानले जाते. हिंदू धर्मानुसार कासवाला विष्णूचा अवतार म्हटले जाते. विष्णूच्या १० अवतारांमध्ये त्याचा समावेश आहे. तर कासव देखील समुद्रमंथनातून बाहेर आले होते. असे मानले जाते की भगवान विष्णू कछाप अवतारात आले आणि त्यांनी मंदार पर्वत आपल्या पाठीवर घेतला. त्यामुळे आजही त्याची पूजा केली जाते. लक्षणीय बाब म्हणजे वास्तूनुसार घरात कोणत्याही धातूचे कासव ठेवणे शुभ असते. (Keeping a crystal turtle in the house like this leads to economic progress). 

दरम्यान, घर किंवा ऑफिसमध्ये क्रिस्टल कासव ठेवल्यास वास्तू दोष दूर होऊ शकतो. त्यामुळे त्याचे फायदे आणि त्याला ठेवण्याची योग्य दिशा माहित असणे आवश्यक आहे. चला तर म जाणून घेऊया क्रिस्टल कासव कोणत्या दिशेला ठेवल्याने त्याचा शुभ लाभ मिळतो तसेच आपल्या संपत्तीत वाढ होते. 

अधिक वाचा : दहावी (SSC) बोर्डाचा निकाल आज दुपारी १ वाजता होणार जाहीर 

क्रिस्टल कासव ठेवण्याचे फायदे

  1. जर तुम्हाला झोपेशी संबंधित समस्या असतील तर क्रिस्टल कासव तुमच्या डोक्याजवळ ठेवा. असे केल्याने झोपेच्या समस्येवर मात करता येते. 
  2. घराच्या मंदिरात पिवळ्या कापडामध्ये क्रिस्टल कासव ठेवा, असे करणे शुभ मानले जाते. 
  3. जर तुम्हाला भरपूर पैसा मिळवायचा असेल तर घरातील तिजोरीत क्रिस्टल ठेवणे चांगले आहे. 

कोणत्या दिशेला ठेवावे क्रिस्टलचे कासव 

वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला क्रिस्टल कासव ठेवणे चांगले मानले जाते. असे केल्याने संपत्तीत वाढ होण्याची दाट शक्यता असते. याशिवाय शत्रूपासूनही सुटका होऊ शकते. तसेच माता लक्ष्मीला देखील क्रिस्टल कासव खूप प्रिय आहे. ते घरात ठेवल्यास आर्थिक प्रगती होऊ शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी