Raksha Bandhan Muhurat 2020: जाणून घ्या रक्षाबंधनासाठीचा शुभ मुहूर्त कधी आहे?

Raksha Bandhan Date, Time and Muhurat: हिंदू परंपरेमध्ये रक्षाबंधनाचं खूप महत्त्व आहे. यंदा रक्षाबंधन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात येतोय. तेव्हा जाणून घ्या रक्षाबंधन २०२० विषयी काही महत्त्वाच्या गोष्टी.

Raksha Bandhan 2020 date, time and Shubh Muhurat
जाणून घ्या कधी आहे रक्षाबंधन? पाहा शुभ मुहूर्त आणि महत्त्व  

थोडं पण कामाचं

  • श्रावण पौर्णिमेला साजरी केली जाते राखीपौर्णिमा
  • बहीण-भावाचं नातं सुदृढ करणारा सण
  • जाणून घ्या राखीपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

मुंबई: रक्षाबंधन (Raksha Bandhan) म्हणजेच राखीपौर्णिमा भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सणांपैकी (Festival) एक आहे. हा भाऊ-बहिणीचा सण (Brother-Sister Love) आहे. त्यांच्यातील पवित्र नात्याला समर्पित हा सण आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या मनगटावर प्रेमाचं आणि रक्षणाचं प्रतिक अशी राखी बांधते. भावाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बहीण मागणं मागते आणि एकमेकांना गिफ्ट देऊन सणाचा आनंद द्विगुणीत होतो.

जाणून घ्या यंदा कधी आहे राखीपौर्णिमा

राखीपौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन हे दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला असतं. यंदा २०२० ला राखीपौर्णिमा ही येत्या ३ ऑगस्टला आहे.

राखीपौर्णिमेची तारीख आणि शुभ मुहूर्त (Raksha Bandhan Date and Time 2020)

यंदा २ ऑगस्टला सकाळी ९.२८ मिनीटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे आणि ३ ऑगस्टला रात्री ९.२८ मिनीटांनी पौर्णिमा समाप्त होईल.

राखीपौर्णिमेचे शुभ मुहूर्त (Raksha Bandhan 2020 Auspicious Time)

रक्षाबंधन म्हणजेच राखीपौर्णिमेच्या सणाचा शुभ मुहूर्त सकाळी ९.२० वाजल्यापासून तर रात्री ९.१७ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे या काळात आपण कधीही आपल्या भावाला राखी बांधू शकता. पण त्यातल्या त्यात सर्वात चांगला मुहूर्त हा दुपारी १.४८ मिनीटांपासून तर ४.२९ मिनीटांपर्यंतचा आहे.

रक्षाबंधनाचा अपर्णा मुहूर्त (Raksha Bandhan Aparna Muhurat)

जर आपण अपर्णा मुहूर्तावर राखी बांधायची असेल तर एक खास वेळाची निवड करू शकता. जी वेळ ७.१० मिनीटांपासून तर ९.१७ मिनीटांपर्यंत आहे.

यावेळी भावाला राखी बांधू नका (Time to Avoid on Raksha Bandhan):

बहिणींनी भावाला राखी बांधतांना ‘भद्रा’ ही वेळ टाळावी, जी की पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी असते.

जाणून घ्या भद्रा काळ कधी आहे ते...

  • भद्रा पंच – पहाटे ५.१६ मिनीटांपासून पहाटे ६.२८ पर्यंत
  • भद्रा मुख – पहाटे ६.२८ मिनीटांपासून तर पहाटे ८.२८ पर्यंत
  • भद्रा ३ ऑगस्टला सकाळी ९.२८ मिनीटांनी समाप्त होईल.

राखीपौर्णिमेला गौरी पूजन आणि जानवं बदलण्याची प्रथा

राखीपौर्णिमेच्या दिवशी गौरी पूजन करण्यासचं एक विशेष महत्व आहे, जी पूजा श्रावण पौर्णिमेला केली जाते. ब्राह्मण पुरुषांसाठी हा एक महत्त्वाचा दिवस असतो, कारण या दिवशी ते आपलं पवित्र जानवं बदलत असतात.

पवित्र नात्याचं प्रतिक आहे राखीचा सण

राखीचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो. यावेळी भावाच्या मनगटावर बहीण प्रेमळ बंधन बांधते. हा फक्त एक दोरा नसतो तर बंधनाचं प्रतिक आहे, शक्ती, सुरक्षेचा संदेश आहे. जो प्रत्येक संकटापासून दूर ठेवतो. म्हणून बहीण आपल्या भावाच्या भविष्यासाठी प्रार्थना करते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी