Jyotish Shastra Tips: सोनं हरवल्यास का समजतात अशुभ, हरवलेलं सोनं सापडल्यावर काय होतात परिणाम

Know according to astrology losing gold is considered auspicious or inauspicious : स्वतःच्या मालकीचं सोनं हरवणे, हरवलेलं स्वतःच्या मालकीचं सोनं परत मिळणे तसेच स्वतःच्या मालकीचं सोनं कमावणे या घडामोडींचा आणि गुरु ग्रहाचा भरपूर संबंध आहे. चला जाणून घेऊ सोन्याशी संबंधित शुभअशुभ बाबी.

osing gold is considered auspicious or inauspicious
सोनं हरवल्यास का समजतात अशुभ  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सोनं हरवल्यास का समजतात अशुभ
  • हरवलेलं सोनं सापडल्यावर काय होतात परिणाम
  • जाणून घ्या काय सांगते ज्योतिषशास्त्र

Know according to astrology losing gold is considered auspicious or inauspicious : सोनं हा अतिशय मौल्यवान धातू आहे. हे सोनं महिला असो वा पुरुष सर्वांना प्रिय आहे. सोन्याचे दागिने करून त्या दागिन्यांनी स्वतःला सजविणे महिलांना आवडते. जग कितीही आधुनिक झाले तरी सोन्याचं महत्त्व आजही कायम आहे. बाजारातील सोन्याच्या दरांमध्ये चढउतार सुरू असतात. मागणी आणि पुरवठा यावरून साधारणपणे सोन्याचे दर निश्चित होतात. दर कितीही असले तरी जगभर सोन्याला महत्त्व आणि मागणी आहे. सोन्याची खरेदी आणि सोन्याचा वापर अनेकजण शुभ समजतात. ज्योतिषशास्त्रानुसार सोनं हरवणे आणि कोणाचं तरी हरवलेलं सोनं आपल्याला मिळणं या दोन्ही बाबी अशुभ समजल्या जातात. याउलट स्वतःच्या हिंमतीवर सोनं खरेदी करणं ही बाब शुभ समजली जाते.

आकाशातून बघा भारत

ट्रेंड होत असलेले क्यूट फोटो

'या' सेलिब्रेटींच्या मृत्यूचं गूढ अद्यापही कायम

ज्योतिषशास्त्र गुरु ग्रहाला सोन्याचा कारक समजते. स्वतःच्या मालकीचं सोनं हरवणे, हरवलेलं स्वतःच्या मालकीचं सोनं परत मिळणे तसेच स्वतःच्या मालकीचं सोनं कमावणे या घडामोडींचा आणि गुरु ग्रहाचा भरपूर संबंध आहे. चला जाणून घेऊ सोन्याशी संबंधित शुभअशुभ बाबी.

सोन्याला लक्ष्मी देवीचे रुप समजतात. याच कारणामुळे दिवाळीत लक्ष्मीची सोन्याची प्रतिमा पूजनासाठी ठेवतात. जवळच्या ओळखीतल्यांना लक्ष्मीची सोन्याची प्रतिमा देण्याची पद्धत आहे. ज्योतिषशास्त्रात सोन्याची अंगठी हरवणे अशुभ समजले जाते. एखादे संकट येत असल्याची चाहूल समजली जाते. सोन्याची नथ हरविल्यास बदनामीचा धोका आहे असे समजतात. सोनसाखळी हरवली अथवा चोरली गेली तर वैभव कमी होण्याचा धोका असतो, असे ज्योतिषशास्त्र सांगते. सोन्याचे डूल हरविले तर दुःखद बातमी येईल असे समजतात. स्वप्नात स्वतःला सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेल्या स्थितीत बघणे याला अशुभ समजतात. आर्थिक संकटाची चाहूल समजले जाते.

थोडक्यात सांगायचे तर स्वतःच्या हिंमतीवर झेपेल तेवढी सोन्याची खरेदी शुभ आणि लाभदायी आहे. याउलट सोन्याची चोरी झाली अथवा सोनं गहाळ झाले तर त्यामुले नुकसान होईल, अशुभ घडेल; असे समजले जाते.

डिस्क्लेमर : प्रस्तुत मजकूर संकलित आहे इंटरनेटवरून मिळविला आहे. या मजकुराची जबाबदारी टाइम्स नाउ मराठी घेत नाही. सोन्याबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी