शारदीय नवरात्र 2020: तिथी शुभ मुहूर्त, कधी आहे दसरा, जाणून घ्या सर्वकाही

आध्यात्म
Updated Oct 14, 2020 | 13:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Navratri 2020: या वर्षी शारदीय नवरात्रोत्सवाला १७ ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. जाणून घ्या नवरात्री २०२० कधीपासून आहे. दुर्गा पुजेचे कॅलेंडर कसे आहे. घटस्थापना, अष्टमी, नवमी, दसरा कधी आहे घ्या जाणून सर्वकाही

navratri 2020
नवरात्र 2020: तिथी शुभ मुहूर्त, कधी आहे दसरा, जाणून घ्या 

थोडं पण कामाचं

 • या वर्षी अधिक मास आल्याने दसरा आणि नवरात्र एक महिना उशिराने येत आहे.
 • नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसोबतच विविध मंडपांमध्ये देवीची मूर्ती बसवतात.
 • २५ ऑक्टोबरला महानवमी रविवारी आहे.

मुंबई: शारदीय नवरात्र(navaratri 2020) हिंदू सणांमधील(hindu festival) महत्त्वाचा सण मानला जातो. या वर्षी १७ ऑक्टोबरपासून नवरात्राला(navratri festival) सुरूवात होत आहे. यानंतर दसरा(dassera) येतो. या वर्षी अधिक मास आल्याने दसरा आणि नवरात्र एक महिना उशिराने येत आहे. पितृपक्ष संपल्यानंतर लगेचच घट बसतात. मात्र यंदा अधिक मास आल्याने घट एक महिना उशिराने बसले आहेत. जाणून घेऊया नवरात्री कधीपासूनुर होता. नवरात्रीची तिथी, दुर्गा पुजा कॅलेंडर, घटस्थापना, अष्टमी नवरात्र, दसरा तारीख मुहूर्त सर्वकाही जाणून घेऊया

हिंदू पंचांगानुसार शारदीय नवरात्रीचा प्रारंभ अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला होतो. या वेळेस ही तिथी १७ ऑक्टोबरला आहे. खास गोष्ट म्हणजे यावर्षी पूर्ण वर्षभर नवरात्री असेल. 

असे आहे नवरात्रीचे कॅलेंडर

 1. १७ ऑक्टोबर २०२०: पहिली नवरात्र- देवी शैलपुत्री पुजाची पुजा- घटस्थापना
 2. १८ ऑक्टोबर२०२०: दुसरी नवरात्र - देवी ब्रह्मचारिणीची पूजा
 3. १९ ऑक्टोबर २०२०: तिसरी नवरात्र- देवी चंद्रघंटा पुजा ची पूजा
 4. २० ऑक्टोबर २०२०: चौथी नवरात्र - देवी कुष्देवीडा ची पूजा
 5. २१ ऑक्टोबर २०२०: पाचवी नवरात्र - देवी स्कंदमाता ची पूजा
 6. २२ ऑक्टोबर २०२०: - षष्ठी नवरात्र- देवी कात्यायनी ची पूजा
 7. २३ ऑक्टोबर २०२०:- सातवी नवरात्र - देवी कालरात्रिची पूजा
 8. २४ ऑक्टोबर २०२०:- आठवी नवरात्र- देवी महागौरी दुर्गा ची पूजा
 9. २५ ऑक्टोबर २०२०:- नवमी- देवी सिद्धिदात्री ची पूजा आणि दसरा

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि पुजाविधी

वर्षात दोन नवरात्री येतात. पहिल्या नवरात्रीला कलशाची स्थापना केली जाते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवरात्राला १७ ऑक्टोबरला सुरूवात होतआहे. या दिवशी कलशाची स्थापना केली जाते. यासाठीचा शुभ मुहूर्त सकाळी ७ वाजून ५८ मिनिटांपासून तेस ९ वाजेपर्यंत आहे. या वेळेस घटस्थापना केली जाऊ शकते. 

दुर्गापूजा 

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेसोबतच विविध मंडपांमध्ये देवीची मूर्ती बसवतात. तसेच नऊ दिवस देवीची पुजा अर्चा केली जाते. 

कधी आहे नवमी आणि दसरा

या वर्षी नवमी आणि दसरा एका दिवशी आहे. २४ ऑक्टोबरला महाअष्टमी शनिवारी येत आहे या दिवशी भक्तगण महागौरीची पुजा करतात तर २५ ऑक्टोबरला महानवमी रविवारी आहे. या दिवशी नऊ दिवसांचा उपवास सोडला जातो. या दिवशी देवीचे विसर्जन केले जाते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी