मुंबई: वास्तुशास्त्रात घराचे प्रत्येक सामान ठेवण्याची योग्य दिशा आणि त्याच्या उपयोगाबाबत काही माहिती सांगण्यात आलेली आहे. जर या वस्तू वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेत योग्य पद्धतीने ठेवल्यात घरा सुख-समृद्धी येते. मात्र यात गडबड झाल्यास नुकसान आणि अनेक समस्यांचे कारण ठरू शकते. कचरा ठेवण्याची जागा अथवा डस्टबिन या महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. जर डस्टबिन योग्य ठिकाणी ठेवला नाही तर घराचे सदस्यांसाठी समस्येचे कारण ठरू शकतात. जाणून घ्या कचऱ्याचा डबा ठेवण्याची योग्य दिशा कोणती..know all the vastu tips for dustbin
अधिक वाचा - .दिल्लीहून आलेल्या प्रवाशांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला
वास्तुशास्त्रानुसरा घरातील कचऱ्याचा डबा कधीही उत्तर-पूर्व दिशेला ठेवू नये. असे केल्याने घरातील सदस्याला मानसिक ताण जाणवू शकतो. सोबतच लक्ष्मी माता नाराज होऊ शकते. कारण या दिशेला देवी-देवतांचा वास असतो.
घराच्या दक्षिण पूर्व दिशेला ठेवलेला कचऱ्याचा डबा घरातील लोकांचा ठेवलेला पैसा खर्च करते. हा पैसा घरात टिकू देत नाही. काही बाबतीत हे कर्जाचे कारण ठरू शकते.
घराच्या पूर्व अथवा उत्तर दिशेला कचऱ्याचा डबा ठेवण्याची चूक करू नका. असे केल्याने घरातील सदस्यांची प्रगती थांबते. त्यांना नवीन संधी मिळत नाही.
कचऱ्याचा डबा ठेवण्याची योग्य दिशा आहे दक्षिण अथवा दक्षिण-पश्चिम दिशा. याशिवाय उत्तर-पश्चिम दिशेलाही कचऱ्याचा डबा ठेवू शकता. असे केल्याने घरात सुख-समृद्धी बनते.
अधिक वाचा - Weight loss: हे फळ खाल्ल्याने तुमचे वजन होईल कमी
कचऱ्याच्या डब्याबाबत ही गोष्ट लक्षात ठेवा की नियमितपणे कचरा फेकत राहा. घरात कचऱ्याचा ढीग लावू नका. कचऱ्याचा डबा नेहमीच झाकून ठेवा, नाहीतर यामुळे घरात नकारात्मक उर्जेचा संचार होतो.