या दिवशी आहे दसरा, जाणून घ्या विजयादशमी पुजेचा मुहूर्त आणि महत्त्व

आध्यात्म
Updated Oct 23, 2020 | 17:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Dussehra 2020 शारदीय नवरात्रीच्या दशमी तिथीला दरवर्षी दसऱ्याचा सण साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन मासातील शुक्लपक्षाच्या दशमीला दसरा म्हणजेच विजयादशमी साजरी केली जाते.

Dussehra
जाणून घ्या विजयादशमी पुजेचा मुहूर्त आणि महत्त्व 

थोडं पण कामाचं

  • अश्विन मासाच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला दरवर्षी दसरा साजरा केला जातो
  • विजयादशमीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याची मात
  • विजयादशमीच्या दिवशी दुर्गा माताच्या मूर्तींचे विसर्जन होते

मुंबई: शारदीय नवरात्रीतील(shardiya navratra) आज सातवा दिवस. आज महासप्तमीच्या दिवशी कालरात्री आईची पुजा केली जाते. नवरात्रीची प्रत्येक तिथी महत्त्वाची असते. मात्र अष्टमी तसेच महानवमी विशेष असते. दशमीच्या दिवशी विजयादशमी(vijayadashami) म्हणजेच दसरा(dassera) सण असतो. या दिवशी शारदीय नवरात्रीचे उद्यापन होते. विजयादशमीच्या दिवशी दुर्गा माताच्या मूर्तींचे विसर्जन होते. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दुर्गा मातेची पुजा केली जाते. तसेच संध्याकाळच्या वेळेस रावण, मेघनाद आणि कुंभकर्णाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. 

जाणून घ्या या वर्षी दसरा किती तारखेला आहे. त्या दिवसाचा पुजेचा मुहूर्त

कधी आहे दसरा

हिंदू पंचागानुसार अश्विन मासाच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला दरवर्षी दसरा साजरा केला जातो. या वर्षी अश्विन शुक्ल दशमी तिथीचा प्रारंभ २५ ऑक्टोबर सकाळी ७ वाजून ४१ मिनिटांनी होत आहे. हा २६ ऑक्टोबर सकाळी ९ वाजेपर्यंत हे. यावर्षी दसऱ्याचा सण २५ ऑक्टोबरा रविवारी साजरा केला जाईल. दिवाळीच्या २० दिवसआधी साजरा केला जातो. 

दसऱ्यासाठी पुजेचा शुभ मुहूर्त

विजयादशमीच्या पुजेचा शुभ मुहूर्त दुपारी १ वाजून १२ मिनिटांनी सुरू होत दुपारी ३ वाजून २७ मिनिटांपर्यंत आहे. तुम्हाला पुजेसाठी २ तास १५ मिनिटांची वेळ आहे. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५७ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ४२ मिनिटांपर्यंत आहे. हा एकूण वेळ ४५ मिनिटांचा आहे. 

दसऱ्याचे महत्त्व

भगवान श्रीराम यांनी सीतेला रावणाच्या लंकेतून सोडवण्यासाठी लंकेवर चढाई केली होती. रावणाची राक्षसी सेना आणि श्रीराम यांची वानरसेना यांच्यात मोठे युद्ध झाले होते. यात रावण, मेघनाद, कुंभकर्ण हे सर्न राक्षस मारले गेले होते. रावणावर श्रीराम यांनी मिळवलेला विजय हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. तसेच दुर्गा मातानेही महिषासूर राक्षसाचा वध करून सर्व देवतांना आणि मनुष्यांना त्याच्या अत्याचारातून मुक्ती दिली होती. विजयादशमीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याची मात तसेच असत्यावर सत्याचा विजय मानला जातो. 

या दिवशी अनेक ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. १० दिवस चालणाऱ्या या रामलीलाचे समापन रावण दहनासह होते.दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यामागचे कारण म्हणजे व्यक्तीने आपल्यातील वाईटपणा नष्ट करून चांगल्या सवयी आणि आचरण अनुसरावे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी