Ram madir bhoomi pujan: आज अयोध्येत राम मंदिराचा शिलान्यास, सहभागी होण्यासाठी अशी करा घरी पुजा

आध्यात्म
Updated Aug 05, 2020 | 12:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

pooja vidhi for ram mandir: अयोध्येत राम मंदिरासाठी आज शिलान्यास होत आहे. तुम्हीही यात सहभागी होऊ शकता. जाणून घ्या यासाठीची पुजाविधी

bhoomipujan
घरातूनच व्हा भूमिपूजनात सहभागी...पाहा कसे ते  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • अयोध्येत राम मंदिराच्या निर्मिती कार्याला सुरूवात होत आहे. 
  • आज दुपारी राम नगरीत शिलान्यासाचा कार्यक्रम होत आहे. 
  • तुम्ही घरी राहूनही यात सहभागी होऊ शकता

मुंबई: आज ५ ऑगस्ट २०२०ला अयोध्येत श्री राम जन्मभूमि स्थळावर भव्य मंदिराची निर्मिती करण्याच्या उद्देशाने शिलान्यास पूजनाचा कार्यक्रम आहे. कोरोनाचा कहर सुरू असल्यामुळे या कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती असणार नाही. जनमनात राम वसलेले आहेत. राम परब्रम्ह आहेत. एकीकडे अयोध्येत हे भव्य पवित्र कार्य होत असताना तुम्ही घरी राहूनची यात सहभाग घेऊ शकता. 

अशी करा सुरूवात

सकाळी लवकर उठून श्री रामरक्षास्त्रोताचे पठण करा. आपल्या देवघरात तुपाचा दिवा लावा. देवाला गंगाजलाने स्नान घाला आणि नवे वस्त्र आणि आभूषणे घाला. सुगंधित धूप लावा. देवाला नैवेद्य दाखवा. या दिवशी संपूर्ण दिवसभर श्री रामचरितमानसचे पठण करा. कुटुंबातील सदस्यांनी एकामागोमाग एक पठण करा. 

हनुमान उपासनेचाही दिवस

हनुमानाची उपासनेसालाही विशेष महत्त्व आहे. जर संपूर्ण श्री रामचरितमानसचे पठण करणे शक्य नसेल तर सुन्दरकाण्डचे पठण करा. हनुमानचालिसाचे १०० पाठ खूपच पुण्यदायी ठरतात. तसेच बजरंगबाण आणि हनुमानबाहुकचेही पठण करू शकता. यासोबतच घरातच विष्णूसहस्त्रनामाचा जप करा. ॐ नमो भगवते वासुदेवाय महामन्त्र हा निरंतर जप करत राहा. 

रामाचा जप केल्याने मिळते पुण्य

घरातील सर्व सदस्यांनी एकत्रित बसून भजन करा. भगवान रामाच्या नावाचा जप केल्यास पुण्य मिळते. अनेक पाप दूर होतात. घरातही एक सोहळ्याचे वातावरण तयार होते. सर्वांमध्ये प्रेम राहते. सगळे सदस्यांनी एकत्र बसून राम कथा ऐका, भगवानाच्या कथेमधील विविध प्रसंगांचा संपूर्ण आनंद घ्या. यामुळे घरात भक्तीमय वातावरण तयार होईल. 

शिव पूजनाचे महत्त्व

घरातच श्री रामांच्या पुजेसोबत भगवान शंकराचीही पुजा करा. भगवान राम शंकरांची आणि शंकर भगवान श्री रामांची पुजा करतात. घरातच शंकराच्या प्रतिमेसमोर बसून राम नाम कीर्तन आळवा. 

घरातच लावा दिवे

आजच्या दिवशी भगवान राम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत राम मंदिराचा शिलान्यास होत आहे. त्यामुळे आपण 
सर्वांनी मिळून संध्याकाळी आपले घर दिव्यांनी सजवून टाका. गोडाधोडाचे पदार्थ बनवा. संपूर्ण रात्रभर दिवे जळत राहायला हवेत. यामुळे भगवान श्री रामांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहील. राम ब्रम्हांडनायक आहेत. राम भगवान विष्णूचा अवतारही आहेत.

तुम्ही जरी घरी असलात तरी तुमचे मन अयोध्येत असेल तर मानसिक पूजेलाही तितकेच महत्त्व आहे. संपूर्ण घरात गंगाजल शिंपडून ते स्वच्छ करून घ्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी