मुंबई: हिंदू धर्मानुसार(hindu religion) दरवर्षी कार्तिक शुक्ल पक्ष एकादशीला तुळशीचे लग्न( ,. लावले जाते. या दिवशी हिंदू रितीनुसार तुलसी माता आणि शालिग्राम यांचा विवाह केला जातो. असं म्हणतात की हा विवाह पार पडल्याने केवळ तुळशी मातेचाच नव्हे तर विष्णू देवाचा आशीर्वादही मिळतो.
हिंदू धर्मानुसार तुलसी विवाह खूप महत्त्वपूर्ण आहे. या दिवशी विष्णू आपल्या ४ महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात. यानंतर भगवान विष्णू शालिग्रामचे रूप घेऊन तुळशीसोबत संपूर्ण विधीवत विवाह करण्यास जातात. हिंदू धर्मात असे मानले जाते ी ज्यांच्या घरात तुळशीचे रोप असते तेथे हा विवाह जरूर केला जातो. या विवाहानंतरही इतर लग्नांना सुरूवात होते. ज्यांना मुली नसतात असे लोक तुळशी मातेचा विवाह करून आणि तिचे कन्यादान करून पुण्य मिळवतात.
तुळशीमातेचे खरे नाव वृंदा होते. तिचा जन्म राक्षस कुळात झाला होता मात्र ती विष्णूची मोठी भक्त होती. वृंदा जेव्हा मोठी झाली तेव्हा तिचा विवाह जलंधर नावाच्या राक्षसाशी करण्यात आला. वृंदा विष्णू देवाची मोठी भक्त होती त्यासोबतच ती एक पतीव्रता स्त्रीही होती. तिची भक्ती आणि पुजेमुळे तिचा पती जलंधराचा विजय होत गेला आणि त्याला आपल्या विजयावर त्याला गर्व वाटू लागला आणि त्याने स्वर्गावर आक्रमण करत देवांच्या कन्यांना आपल्या अधिकारात घेतले. यावर क्रोधित होत सर्व देव विष्णूच्या शरण गेले आणि जलंधरचा अंत करण्यासाठी प्रार्थना करू लागले. मात्र जलंधरचा अंत करण्यासाठी सगळ्यात आधी त्याची पत्नी वृंदाचे सतीत्व भंग करणे गरजेचे होते. भगवान विष्णूंनी मायाजालचा वापर करत जलंधरचे रूप धारण करून वृंदाच्या पतिव्रता धर्माला नष्ट केले याचा परिणाम म्हणून जलंधरची शक्ती संपत गेली आणि तो युद्धात मारला गेला. मात्र जेव्हा वृंदाला हे समजले तेव्हा तिने विष्णूंना सवाल केल की मी तुमची जन्मभर पुजा अर्चा केली तर तुम्ही माझ्यासोबत असे का केले.
या प्रश्नाचे उत्तर विष्णू देऊ शकले नाहीत. तेव्हा वृंदाने भगवान विष्णूंना सांगितले की तुम्ही माझ्याशी एका दगडाप्रमाणे व्यवहार केला आहे मी तुम्हाला शाप देते की तुम्ही पाषाण व्हाल. हे ऐकताच श्री हरि पाषाण होतात. त्याचवेळेस निसर्गाचे संतुलन बिघडू लागते. तेव्हा सर्व देवा वृदांला याचना करतात की तिने तिचा शाप मागे घ्यावा. अखेरीस वृंदा भगवान विष्णूंना क्षमा करते आणि त्यांना पापातून मुक्त करत जलंधरसोबत सती गेली. वृंदाच्या राखेतून एक झाड बाहेर पडले ज्याला भगवान विष्णूंनी तुळस हे नाव दिले आणि वरदान दिले की तुळशीशिवाय मी कोणत्याही प्रकारचा प्रसाद ग्रहण करणार नाही. मी शालिग्रामटच्या रूपात तुळशीशी विवाह करेन. कालांतराने लोक या तिथीला तुलसी विवाह म्हणतील. तसेच असे करणाऱ्यांना सुख आणि सौभाग्य मिळेल.
या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व नित्य कामे उऱकून स्वच्छ वस्त्रे परिधान केली जातात. तसेच तुळशी वृंदावनालाही सजवले जाते. या दिवशी प्रसाद म्हणून लाह्या तसेच ऊस, बोरे, आवळे वाटले जातात. तुळशीच्या वृंदावनात या सर्व वस्तू ठेवल्या जातात. त्यानंतर विधीवत तुळशीचे लग्न लावले जाते. अंतरपाट धरला जातो. मंगलाष्टके म्हटली जातात.