Donation Tips: उन्हाळ्याच्या दिवसात दान करण्याच्या या टिप्स तुम्हाला बनवतील श्रीमंत

आध्यात्म
Updated Apr 15, 2022 | 17:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

Astro Tips: उन्हाळ्याच्या दिवसांत काही गोष्टींचे दान करणे तुम्हाला केवळ या जीवनातच नव्हे तर पुढील जीवनातही लाभदायक ठरेल. धर्म-शास्त्रात या गोष्टींचे दान शुभ मानले गेले आहे. 

jagger
उन्हाळ्याच्या दिवसात दान करण्याच्या या टिप्स तुम्हाला बनवतील 
थोडं पण कामाचं
  • हिंदू धर्मात दानाला अतिशय महत्त्व आहे.
  • दान देण्याचे काम हे पुण्याचे काम मानले जाते.
  • उन्हाळा ऋतूत कोणत्या गोष्टींचे दान करणे सगळ्यात पुण्यदायी मानले जाे घ्या जाणून...

मुंबई: हिंदू धर्मात दानाला अतिशय महत्त्व आहे. दान देण्याचे काम हे पुण्याचे काम मानले जाते. इतकं की प्रत्येक खास क्षणी तसेच उत्सवाच्या दिवशी केल्या जाणाऱ्या दानाबाबतही काही नियम आहेत. कोणत्या वेळी कोणत्या गोष्टींचे दान केले गेले पाहिजे यासाठीही काही नियम आहेत. याशिवाय विविध ऋतूंमध्येही दान केल्या जाणाऱ्या गोष्टींबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. उन्हाळा ऋतूत कोणत्या गोष्टींचे दान करणे सगळ्यात पुण्यदायी मानले जाे घ्या जाणून...

अधिक वाचा - केंद्रीय उड्डाण मंत्र्यांनी पायलटला मागितली लिफ्ट

उन्हाळ्याच्या दिवसांत या गोष्टींचे करा दान

गूळ - उन्हाळ्याच्या दिवसांत गुळाचे दान करणे अतिशय शुभ मानले जाते. ज्योतिषानुसार गुळाचे दान कुंडलीतील सूर्याचे स्थान मजबूत करते. यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो, मानसन्मान तसेच यश मिळते. ती व्यक्ती खूप प्रगती करते. 

सत्तू - सत्तूचा संबंध हा गुरू आणि सूर्य या दोन ग्रहांशी असतो. गुरू धन आणि भाग्यामध्ये वृद्धी करतात. तर सूर्य सफलता-सन्मान-आरोग्य आणि आत्मविश्वास देतो. या दोन्ही ग्रहांची कृपा व्यक्तीला चांगले आणि यशस्वी जीवन देते. इतकंच नव्हे तर धर्म-शास्त्रानुसार उन्हाळ्याच्या दिवसांत सत्तूचे दान केल्याने त्या व्यक्तीला परलोकात अन्नाची कमतरता होत नाही. 

पाण्याने भरलेले घडे - उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी पाजणे सगळ्यात पुण्याचे काम असते. यासाठी लोक पाणपोयांची सोय करतात. तसेच सरबत पाजात. या मोसमात जर तुम्ही पाण्याने भरलेले २ घडे दान म्हणून दिले तर ते लाभदायक ठरतात. यात एक घडा आपल्या पूर्वजांच्या नावाने आणि दुसरा भगवान विष्णूच्या नावाने दान करा. या घड्यांमध्ये थोडे गूळ अथवा साखर टाकली तर अधिक उत्तम. 

अधिक वाचा - 'द काश्मीर फाईल्स' नंतर आता 'द दिल्ली फाईल्स'

आंबा - धर्म-शास्त्रात मोसमी फळांचे दानही करण्यास सांगितले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याचे दान करणे शुभ मानले जाते. याचा संबंध सूर्याशी असतो आणि आंब्याचे दान केल्याने सूर्य देवाच्या कृपेने प्रत्येक कामात सफलता मिळते. 


-

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी