Kamada Ekadashi 2022 । मुंबई : अलीकडेच मराठी नववर्षाला सुरूवात झाली आहे, इंग्रजी कॅलेंडरनुसार २ एप्रिल पासून मराठी नवीन वर्षाची सुरूवात झाली आहे. हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी (Ekadashi Tithi) कामदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. पंचागानुसार एका वर्षात एकूण २४ एकादशी असतात. यामध्ये प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात आणि दुसऱ्या कृष्ण पक्षात एकादशी येते. लक्षणीय बाब म्हणजे हिंदू वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच चैत्र महिन्यात येणाऱ्या एकादशीला कामदा एकादशी म्हणून ओळखले जाते. (Know the date, moment, and significance of Kamada Ekadashi).
अधिक वाचा : आयएनएस विक्रांतसाठी जमवलेले पैसे भाजपला दिले
दरम्यान, कामदा एकादशीचे देखील आषाढी-कार्तिकी एकादशी सारखे महत्त्व आहे. या पवित्र दिवशी विधीपूर्वक भगवान विष्णूची पूजा केली जाते. तसेच कामदा एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते असे मानले जाते. विष्णु पुराणानुसार या दिवशी व्रत केल्यास हजारो वर्षाच्या तपश्चर्येप्रमाणेच फळ मिळते. महत्त्वाचे म्हणजे या दिवशी उपवास करणे हे भगवान विष्णुचे अवतार भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहेत.
हिंदू शास्त्रानुसार या दिवशी उपवास केल्याने आपल्या मनातील भावना पूर्ण होते तसेच आपल्याला मोक्ष मिळतो असा समज आहे. तसेच भाविकांना पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होण्यास मदत होते आणि तो मोक्ष प्राप्त करतात. हा उपवास केल्यामुळे भाविकांना शाप आणि पापांपासून संरक्षण देखील मिळते. या व्यतिरिक्त असेही मानले जाते की संतती नसलेल्या जोडप्यांना हा उपवास केल्यावर संतान प्राप्ती होते. लक्षणीय बाब म्हमजे ज्या जोडप्यांना मुलाची अपेक्षा असते त्यांनी गोपाळ मंत्राचे पठन करावे आणि परमेश्वराला पिवळी फळे आणि फुले अर्पण करावी.
अधिक वाचा : थोरात अन् चव्हाणांविरोधात आमदारांची सोनिया गांधींकडे तक्रार
एकादशीची तिथी - १२ एप्रिल, मंगळवार, पहाटे ४.३० वाजता सुरू होईल.
एकादशी समाप्त होण्याची तिथी - १३ एप्रिल, बुधवार, पहाटे ५.२ मिनिटांनी समाप्त होईल.
सर्वार्थ सिध्दी योग - १२ एप्रिल रोजी सकाळी ५.५९ ते १३ एप्रिल रोजी सकाळी ८.३५ पर्यंत असेल.
पारणाची वेळ - १३ एप्रिल दुपारी १.३९ ते ४.१२ पर्यंत.
प्रथम कामदा एकादशीच्या पवित्र दिवशी श्रीविष्णूंसोबत देवी लक्ष्मीला शंखाने अभिषेक घाला. तसेच केशर दुधाने शंख भरून प्रभूला स्नान घाला. नंतर फुले, हंगामी फळे, अत्तर इत्यादी पूजन साहित्य अर्पण करा. पूजा करताना पूजेत ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. तुळशीच्या पानांसह मिठाईचा नैवेद्य दाखवावा. गोमातेच्या मूर्तीलाही विशेष अभिषेक घाला. देवीला वस्त्रे अर्पण करावीत. शक्य असल्यास गायीला नैवेद्य खाऊ घाला. तुळशीच्या पानांसह लोणी आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा. कृ कृष्णाय नमः या मंत्राचा जप करा.