मुंबई: हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला(akshay tritiya) शुभ तिथी मानली गेली आहे. लग्नसमारंभ, गृहप्रवेश, जनेऊसारखी शुभ कार्य करण्यासाठी अक्षय़ तृतीयेचा चांगला मुहूर्त(muhurt) समजला जातो. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो. म्हणजेच या दिवशी कोणतेही शुभ कार्य मुहूर्त काढल्याशिवाय करता येते. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी अक्षय्य तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला असते. या वर्षी अक्षय तृतीया ३ मे २०२२ला साजरी केली जात आहे. Know the date of akshay tritiya 2022
अधिक वाचा - अमरावती हिंसे प्रकरणी भाजप नेत्याला अटक
३ मे २०२२, मंगळवारी सकाळी ५.१९ वाजल्यापासून तृतीया तिथी सुरू होईल आणि ४ मे सकाळी ७.३३ वाजेपर्यंत राहील. रोहिणी नक्षत्र सकाळी १२.३४ वाजल्यापासून ४ मे दुपारी ३.१८ वाजेपर्यंत राहील.
अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ काम करण्यासाठी चांगला दिवस मानला जातो. याशिवाय या दिवशी नवे कपडे, दागिने, घर-गाडी सारख्या महागड्या वस्तू खरेदीसाठी शुभ दिन असतो. या दिवशी अनेक धार्मिक कार्यक्रमही केले जातात. महाराष्ट्र, राजस्थानसारख्या काहीराज्यांमध्ये या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. असं म्हटलं जातं या दिवशी सोने-चांदीची खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते. इतकंच नव्हे तर या दिवशी दान करण्याचीही मोठी परंपरा आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेले दान भरभराटी देते.
अधिक वाचा - वैशाख महिन्यात या वस्तूंचे दान केल्याने संपत्तीत होते वाढ
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करण्यामागे एक मान्यता आहे की, जेव्हा कुणी व्यक्ती आपल्या घरी या दिवशी सोनं खरेदी करून आणतो तेव्हा त्यांच्या घरात लक्ष्मी आणि विष्णू यांचं नेहमी वास्तव्य राहतं आणि देवाची कृपा नेहमीच राहते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण कोणत्याही वेळी सोनं खरेदी करू शकता. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा संपूर्ण दिवश शुभ असतो. या दिवशी सोनं खरेदी करून घरी आणल्यास व्यक्तीचा भाग्योदय होतो, असं म्हणतात.