Narali pournima: जाणून घ्या कधी आहे नारळी पोर्णिमा, यासंबंधित गोष्टी

आध्यात्म
Updated Aug 04, 2022 | 17:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Narali pournima 2022: नारळी पोर्णिमेचा सण ११ ऑगस्टला गुरूवारी साजरा केला जाईल. महाराष्ट्रात या सणाचे अधिक महत्त्व असते. नारळ पोर्णिमेच्या दिवशी समुद्र देवता वरूण आणि इंद्र देवाची पुजा केली जाते. 

narali pournima
जाणून घ्या कधी आहे नारळी पोर्णिमा, यासंबंधित गोष्टी 
थोडं पण कामाचं
  • यावर्षी नारळी पोर्णिमेचा उत्सव ११ ऑगस्टला साजरा केला जात आहे. 
  • हा उत्सव महाराष्ट्रासहित दक्षिण भारतातील समुद्र क्षेत्रात साजरा केला जातो. 
  • हा सण श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या द्वितीयेच्या दिवशी सुरू होतो आणि पोर्णिमेच्या दिवशी समाप्त होते. 

मुंबई: महाराष्ट्रात साजऱ्या केल्या जाणाऱ्या नारळी पोर्णिमेचा(narali pournima) उत्सव खास असतो. हा सण श्रावण मासाच्या(shravan month) पोर्णिमेला साजरा केला जातो. या वर्षी नारळी पोर्णिमेचा उत्सव ११ ऑगस्टला गुरूवारी साजरा केला जात आहे. हा सण महाराष्ट्रासहित दक्षिण भारतातील समुद्री क्षेत्रामध्ये साजरा केला जातो. यामुळेच याला नारळी पोर्णिमा म्हणतात. नारळी पोर्णिमेच्या दिवशी समुद्राची नारळ अर्पण करत पुजा केली जाते. पुजेदरम्यान समुद्र देवताला रक्षा सूत्र आणि नारळ अर्पण केला जातो. अशी मान्यता आहे की या दिवशी समुद्र देवतेची पुजा केल्याने भक्तांचे प्रत्येक कष्ट दूर होतात. जाणून घ्या या सणाचे महत्त्व...

अधिक वाचा - हाॅलिवूड स्टार देव पटेल बनला रियल लाईफ हिरो

जाणून घ्या शुभ मुहूर्त

पोर्णिमा तिथीची सुरूवात ११ ऑगस्ट २०२२ला सकाळी १०.३८ ला सुरू होई. पोर्णिमा तिथी १२ ऑगस्ट सकाळी ७.०५ मिनिटांनी होईल. 

या देवतांची केली जाते पुजा

नारळी पोर्णिमेच्या दिवशी समुद्र देवता वरूण आणि इंद्र देवतेची पुजा होते. हा सण कोळी बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी समुद्राची पुजा केल्यानंतर तसेच नारळ अर्पण केल्यानंतर मच्छिमार बोटी समुद्रात सोडतात. 

अशी करा पुजा

नारळी पोर्णिमेच्या दिवशी पुजा करताना नारळ पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये लपेटून त्याला केळ्याच्या पानांवर ठेवून सजवला जातो. त्यानंतर नारळाची शेंडी समुद्राच्या दिशेने ठेवून विधीवत पुजा केली जाते. तसेच हा नारळ समुद्र देवाला अर्पण केला जातो. या दिवशी नारळ समुद्रात सोडला जातो. दक्षिण भारतात हा सण प्रत्येक समाज तसेच वर्ग आपापल्या पद्धतीने साजरा करतात. या दिवशी जानवे धारण करणारे आपले जानवे बदलतात. 

अधिक वाचा - रिंकू राजगुरुचा सिजलिंग लूक

रक्षाबंधनाचा मुहूर्त

शास्त्रात भद्रकालात श्रावणी पर्व साजरा करण्यास निषेध केला आहे. अशातच रात्री ८.५० वाजता राखी बांधणे शुभ असते. दरम्यान, हिंदू मान्यतेप्रमाणे सूर्यास्तानंतर राखी बांधणे वर्ज्य अते. त्याचमुळे हा सण १२ ऑगस्टला साजरा केला जात आहे. १२ ऑगस्ट शुक्रवारी पोर्णिमा तिथीला सकाळी ७ वाजून १७ मिनिटांपर्यंत आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी