Birthmark Astrology:तुमच्या शरीरावर आहे का जन्मखूण? विविध जन्मखुणांचा काय असतो अर्थ

आध्यात्म
Updated Jul 06, 2022 | 15:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

Birthmark Astrology:अनेक लोकांच्या शरीरावर जन्मत:च काही निशाण असतात ते अनेकदा शुभ अथवा अशुभ असतात. ज्योतिषानुसार विविध जन्मखूणांचा अर्थ वेगवेगळा असतो याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर होतो. 

birthmark
तुमच्या शरीरावर आहे का जन्मखूण? जन्मखूणांचा काय असतो अर्थ 
थोडं पण कामाचं
  • शुभ-अशुभाचे संकेत देतात जन्मखूण
  • जन्मखूणेचा जीवनावर पडतो प्रभाव
  • डाव्या खांद्यावर जन्मखूण असते अशुभ

मुंबई: अनेक लोकांच्या शरीरावर कोणत्या ना कोणत्या ठिकाणी  जन्मखूण(birthmark) असते. काही व्यक्तींची ही जन्मखूण वेळेसोबत मोठी मोठी होत जाते. मात्र ही जन्मखूण अथवा बर्थमार्क अनावश्यक नसते. तर याचा संबंध व्यक्तीच्या नशिबाशी जोडलेला असतो. जन्मखूणेचा त्या व्यक्तीच्या जीवनावर शुभ(shubh) अथवा अशुभ(ashubh) प्रभाव पडतो. समुद्र शास्त्रात जन्मखुणेच्या निशाणाबद्दल विस्ताराने सांगितले आहे. जर तुमच्या शरीरावर जन्मखूण आहे तर तुम्हाला हे जाणणे गरजेचे आहे हे तुमच्यासाठी गुडलक आहे की बॅडलक. know the meaning of birthmark on body

अधिक वाचा - थिएटरमध्येच केलं मुलीचं बारसं, नाव ठेवलं...

पोटावर जन्मखूण

ज्या लोकांच्या पोटावर जन्मखूण असते त्यांच्याबाबत म्हटले जाते की हे खूप लालची आणि  मतलबी स्वभावाचे असतात. यांच्या स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार कमी असतो. 

डोक्यावर जन्मखूण असणे

ज्या व्यक्तींच्या डोक्यावर मधोमध जन्मखूण असते ते खूप रोमँटिक असतात. हे निशाण उजव्या दिशेला असेल तर ते बुद्धिमान असतात. तसेच डोक्याच्या डाव्या दिशेला हे निशाण असेल तर ते व्यक्ती खूप खर्च करणारे तसेच यांच्याकडे पैसा टिकत नाही 

गालावर निशाण

डाव्या गालावर निशाण असलेल्या व्यक्ती नेहमी उदास राहतात. या आपल्या जीवनात नेहमी समस्येने ग्रासलेल्या असतात. याच कारणामुळे त्यांना आनंद मिळत नाही. तर उजव्या गालावर जन्मखूण असल्यास ते मेहनती असतात. ते मेहनतीने आपले स्वप्न पूर्ण करतात. 

हातावर जन्मखूण

ज्या लोकांच्या हातावर जन्मखूण असते ते कुटुंबाप्रती समर्पित असतात. तसेच हातांच्या बोटांवर जन्मखूण असण्याचा अर्थ ते आत्मनिर्भर असतात. कोणत्याही बंधनापासून ते स्वत:ला दूर ठेवतात. तसेच कोणत्याही कामासाठी कोणावर अवलंबून राहत नाहीत. 

अधिक वाचा - अभिमन्यूची जीवन-मरणाची लढाई, अक्षराला बसेल मोठा धक्का

खांद्यावर जन्मखूण

खांद्यावरील डाव्या आणि उजव्या बाजूला बर्थमार्क असण्याचे विविध अर्थ आहेत. जर जन्मखूण डाव्या खांद्यावर असेल तर ती अशुभ मानली जाते. असे लोक आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासलेले असतात मात्र जन्मखूण उजव्या खांद्यावर असेल तर हे शुभ असते. अशा लोकांना जीवनात सर्व सुख-सुविधा मिळतात. 

डिसक्लेमर

(या लेखात दिलेली कोणतीही माहिती किंवा गणनेच्या सत्यतेचा आणि अचूकतेचा दावा केलेला नाही. वेगवेगळी माध्यमे, ज्योतिषी, पंचांग, प्रवचने, मान्यता (श्रद्धा) आणि धर्मग्रंथांमधून संग्रहित करून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येते. याचा उद्देश केवळ माहिती देण्याचा आहे. टाईम्स नाऊ याच्याशी सहमत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी