मुंबई: अनेकदा आपली स्वप्ने आपल्या भविष्याबद्दल संकेत देत असतात. ही स्वप्ने तुम्ही भविष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींच्या नजरेने पाहू शकता. प्रत्येक स्वप्नांचा काही ना काही अर्थ असतो. जाणून घ्या काय सांगतात स्वप्ने.
अधिक वाचा - गुलाबराव पाटील यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
एखाद्या वव्यक्तीने स्वप्नात जर एखाद्याला थोबाडीत मारताना पाहिले तर ते शुभ असते का अशुभ. याचे उत्तर हे शुभ संकेत नाहीत. याचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होतेय. याचाच अर्थ तुम्ही विनाकारण एखाद्या वादात अडकू शकता. तसेच शत्रू तुमच्यावर प्रभावी ठरू शकतो. तुमच्याविरुद्ध एखादा कटही रचला जाऊ शकतो.
आर्थिक तसेच शारिरीकही नुकसान होऊ शकते. यासाठी सतर्क राहा.
स्वप्नात जर दलदल दिसली तर याचा अर्थ शुभ संकेत नाही. तुम्ही एखाद्या अडचणीत अडकू शकता. तसेच तुमच्यासमोर त्या समस्येचे निराकरण असणार नाही. नवा पर्याय शोधण्यास तुम्हाला अडचण येऊ शकते, तसेच कामाच्या बाबतीत खूप आळस असणे.
पडण्याची स्वप्ने अनेकदा नियंत्रण गमावण्याच्या भीतीने उत्पन्न होतात. जर असे स्वप्न पडले असेल तर तुम्हाला वर्तमानातील स्थितीची मूल्यांकन केले पाहिजे आणि समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे स्वप्न तु्म्हाला असुरक्षा, अस्थिरता आणि चिंतांचे संकेत देतात. असे कोणतेही स्वप्न आल्यास सतर्क राहा की आपल्या करिअरमध्ये चढ-उतार येणार आहेत.
अधिक वाचा - केजीएफ 2 ठरला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा सिनेमा
पाणी हे भावनांचे प्रतीक असते. यासाठी तुम्ही जर स्वत:ला पाण्यात बुडत संघर्ष करताना पाहिले असेल तर तुमच्या भावना तुम्हाला जीवनातील या क्षेत्रात मदतीसाठी बोलावत आहेत जिथे तुमचे नियंत्रण नसते. पाण्यामध्ये बुडणे आपल्या करिअरच्या असमर्थतेचे संकेत देतात.