Dream Vastu: जाणून घ्या स्वप्नात ढग पाहण्याचा काय आहे अर्थ...

आध्यात्म
Updated Aug 05, 2022 | 15:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

Meaning of seeing clouds in dream: स्वप्नात येणाऱ्या गोष्टी प्रत्येक घटनांबाबत संकेत देत असतात. ही घटना चांगली अथवा वाईट असू शकते. स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात ढग पाहणे हे शुभ मानले जाते. 

sky
Dream Vastu: जाणून घ्या स्वप्नात ढग पाहण्याचा काय आहे अर्थ.. 
थोडं पण कामाचं
  • असे मानले जाते की स्वप्ने ही चांगल्या अथवा वाईट घटनांचे संकेत देतात. 
  • अनेकांना स्वप्नात बऱ्याचदा ढग दिसतात
  • असे मानले जाते की स्वप्न ढग दिसल्याने भाग्य बदलते. 

मुंबई: प्रत्येकजण स्वप्न पाहतो. स्वप्न पाहणे ही सामान्य बाब आबे. स्वप्ने ही चांगली अथवा वाईट असू शकतात. स्वप्नशास्त्रात स्वप्नांना एक विशेष महत्त्व दिले आहे. असे मानले जाते की स्वप्ने ही आपल्याला चांगल्या अथवा वाईट घटनांचे संकेत देतात. यासाठी स्वप्नांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. अनेक लोकांच्या स्वप्नात ढग येतात.असे मानले जाते की स्वप्नात ढग पाहण्याने भाग्य बदलते. स्वप्नात ढग पाहणे हे अतिशय शुभ मानले जाते. जाणून घेऊया स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात ढग पाहण्याचे काय आहेत संकेत आणि काय आहे अर्थ...

अधिक वाचा - दहीहंडीसाठी भाजप- मनसेची स्किम; गोविंदांना 'विमा' कवच

भविष्यातील आनंदाचे संकेत मिळतात

स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात ढग पाहणे हे अतिशय शुभ संकेत देणारे आङे मात्र स्वप्नात ढग कसे दिसतात हे ही तितकेच अवलंबून आहे. स्वप्नाशास्त्रानुसार स्वप्नात ढग पाहण्याचा अर्थ तुम्हाला भविष्यात प्रगती होणार आहे. हे भविष्यात येणाऱ्या आनंदाचे संकेत देतात हे स्वप्न चांगले मानले जाते. 

गर्जणारे ढग पाहणे शुभ

तर काही लोकांच्या स्वप्नात गर्जना करणारे ढग दिसतात. गर्जणारे ढग स्वप्नात पाहणेही शुभ मानले जाते. हा एक आनंदाचा संकेत आहे. दरम्यान गर्जणारे ढग असेही संकेत देतात की तुम्ही एखाद्यावर राग काढणार आहात. यामुळे स्वप्न पाहिल्यानंतर आनंदासोबत थोडी सावधानता बाळगणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 

काळे ढग पाहणे असते अशुभ

याशिवाय स्वप्नात ढगफुटी होताना पाहणे अथवा काळे ढग पाहणे हे शुभ मानले जात नाही. हे स्वप्न संकेत देते की येणाऱ्या काळात तुमचे नुकसान होणार आहे. याशिवाय हे स्वप्न येणाऱ्या समस्येचेही संकेत देतात. अशी स्वप्ने ही अशुभ फळ देणारी स्वप्ने असतात. 

अधिक वाचा - नाईट क्लबमध्ये मोठी दुर्घटना, १३ जणांचा होरपळून मृत्यू

स्वप्नात कावळा येणे शुभही ठरू शकते 

गरुड पुराणानुसार, कावळा हा अशुभ असतो. यामुळे स्वप्नात जर कावळा दिसला तर काही तरी वाईट घडेल याचे संकेत असतात. मात्र कावळा स्वप्नात दिसण्याचा अर्थ प्रत्येक वेळी अशुभ संकेतच असते असे नाही. अनेकवेळा कावळा स्वप्नात दिसणे हे शुभ देखील असू शकते. हे सर्व स्वप्नात नेमके काय दिसले आणि कावळा कशा प्रकारे दिसला यावर अवलंबून असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी