अयोध्या यासाठी सजले निळ्या अपराजिता फुलांनी, जाणून घ्या याचे धार्मिक महत्त्व 

Blue Aparajita Flowers : राम मंदिराचे भूमीपूजनाला अयोध्या ४०० क्विंटल फुलांनी सजविण्यात आले आहे. या रंगबेरंगी फुलांमध्ये सर्वाधिक फूल हे निळ्या रंगाचे अपराजिता फूल आहेत. ही फुलं देवाच्या पूजनात विशेष महत्त्वाची

know the reason behind the decoration of ayodhya with blue aparajita flowers
अयोध्या यासाठी सजले निळ्या अपराजिता फुलांनी 

थोडं पण कामाचं

  • निळ्या रंगाचे अपराजिता फूल धारण केल्याने कायम अपराजित राहतो असे वरदान मिळाले आहे
  • भगवान श्रीरामाला खूप प्रिय मानले जातात हे अपराजित फुलं
  • अपराजिता फूल वाहिल्याने शनी आणि शंकरही प्रसन्न होतात. 

अयोध्या :  राम जन्मभूमीला सजविण्यााठी देशातून नाही तर परदेशातून फूलं मागविण्यात आली आहेत. लाल, नारंगी आणि डबल टोन असणारे झेंडूची फुलांव्यतिरिक्त विशेष करून निळ्या रंगाचे अपराजिता फूल मागविण्यात आले आहेत. अयोध्या नगरीत या निळ्या अपराजिता (विष्णूकांता) फुलांचे कायम महत्त्व आहे. धार्मिक दृष्ट्या हे निळे अपराजिता फुलं खूप महत्त्वाचे आहेत. खास करून विष्णूच्या पूजेव्यतिरिक्त माता दुर्गा आणि शंकराची पूजेत ही फुलं अर्पण केली तर त्याचा पूण्यलाभ होतो. जाणून घेऊ या या निळ्या अपराजिता फुलांना इतकं महत्त्व का आहे. 

ही फुलं धारण केल्याने होतो अद्भूत लाभ 

अपराजिताचे फूल धारण केल्याने कधीही पराजय होत नाही. त्यामुळे हे कारण आहे की श्रीरामाला अपराजिता फूल खूप प्रिय आहे. मोर पिसाच्या रंगाप्रमाणे दिसणारे हे फूल विष्णूचे सर्वाधिक प्रिय फूल मानले गेले आहे. हे फूल शनिदेवाला अर्पण केले तर शनीच्या साडेसातीच्या महादशेने मिळणाऱ्या कष्टातून दिलासा मिळतो.  मान्यता आहे की हे फूल धारण केले की कोणतेही कार्य केल्यास त्यात अपयश येत नाही. 

घरात आवश्य लावले पाहिजे फूल 

अपराजिता फुलाचे झाड घरात लावले जाते. त्यामुळे मानसिक सुख आणि शांती कायम राहते. अपराजिता या निळ्या फुलाने विष्णूची पूजा केली जाते, त्यामुळे मनुष्याला अपराजित राहण्याचे वरदान मिळते. हे कारण आहे की अयोध्येत राम जन्मभूमी पूजनाला शहराला निळ्या रंगाच्या अपराजिता फुलांनी सजवलं आहे. शहराला सुमारे ४० क्विटंल फुलांनी सजविण्यात आले आहे. अयोध्येला सजविण्यासाठी देशातून नाही तर परदेशातूनही फुलं मागविण्यात आली आहेत. थायलंडवरून अनेक प्रकारचे फुलं मागविण्यात आली आहेत. निळ्या अपराजिता फुलांसोबत नारंगी आणि लाल रंगांचे डबल टोंड झेंडूची फुल कोलकत्यातून मागविले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी