Vastu Tips: तूप आणि तेलाच्या दिव्याचे आहेत वेगवेगळे नियम

आध्यात्म
Updated Jul 22, 2022 | 17:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

वास्तुशास्त्रात दिशांवर अधिक भर देण्यात आला आहे. कोणत्याही गोष्टीचा सकारात्मक प्रभाव तेव्हाच मिळतो तेव्हा ते योग्य दिशेला असे. घराच्या देव्हाऱ्यात लावल्या जाणाऱ्या दिव्याबाबतचे नियम घ्या जाणून...

pooja deepak
Vastu Tips: तूप आणि तेलाच्या दिव्याचे आहेत वेगवेगळे नियम 
थोडं पण कामाचं
  • वास्तु जाणकारांच्या मते दिवा कधीही देवाच्या मूर्तीसमोर ठेवू नका.
  • तूप आणि तेलाच्या दिव्यातील वातीबाबत अनेक नियम सांगितले आहेत.
  • वास्तुनुसार दक्षिण दिशेला माता लक्ष्मी आणि यमाचा वास असतो.

मुंबई: वास्तुशास्त्रात(vastu shastra) दिशांवर अधिक भर देण्यात आला आहे. जर कोणत्याही गोष्टीसाठी योग्य दिशा ध्यानात घेतली नाही तर त्याचे विपरित परिणाम समोर येतात.वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी पॉझिटिव्ह(positive) आणि निगेटिव्ह एनर्जी(negative energy) देत असतात. अशातच घराच्या देव्हाऱ्याबाबतही वास्तुमध्ये अनेक नियम सांगितले आहे. मंदिरात लावला जाणारा दिवा(diva) पॉझिटिव्हिटीचे प्रतीक मानला जातो. अशी मान्यता आहे की घरातील देव्हाऱ्यात दिवा लावल्याने निगेटिव्ह उर्जा संपते. मात्र याबाबतही अनेक नियम सांगितले आहेत. या बाबतीतले नियम न पाळल्याने समस्या उत्पन्न होतात. (know the rules of deepak for mandir)

अधिक वाचा - प्रजनन शक्ती कमी होत असेल तर करा ही 3 योगासने

कुठे ठेवावा तूप आणि तेलाचा दिवा

वास्तु जाणकारांच्या मते दिवा कधीही देवाच्या मूर्तीसमोर ठेवू नका. जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर तो नेहमी डाव्या दिशेला ठेवा. तर तेलाचा दिवा उजव्या बाजूला ठेवावा.

वातीबाबत ही गोष्ट ठेवा ध्यानात

तूप आणि तेलाच्या दिव्यातील वातीबाबत अनेक नियम सांगितले आहेत. दिवा लावलाताना वातीचा वापर करणे गरजेचे आहे. तेलाचा दिवा लावताना लाल रंगाच्या धाग्याने बनवली पाहिजे. तर तुपाचा दिवा लावताना कापसाची वात गरजेची असते. 

अधिक वाचा - शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सेबीची मोठी घोषणा

या दिशेला ठेवा दिवा

  1. वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की दिवा कधीही पश्चिम दिशेला लावू नये. जर असे कोणी करत असेल तर त्यांना कंगालीचा सामना करावा लागतो. संध्याकाळच्या वेळेस घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावल्याने लक्ष्मी मातेची कृपा राहते. 
  2. वास्तुनुसार दक्षिण दिशेला माता लक्ष्मी आणि यमाचा वास असतो. यासाठी दक्षिण दिशेला दिवा लावल्याने लक्ष्मी मातेची कृपा राहते. तसेच घराच पैशांची कमतरता राहत नाही. 
  3. दक्षिण दिशेला दिवा लावल्याने यमराज प्रसन्न होतात आणि अवेळी मृत्यूचे भय राहत नाही. 
  4. घराच्या उत्तर दिशेला दिवा लावल्याने घरात गरिबी येते. 
  5. घरात सकाळ-संध्याकाळ दिवा लावला तर घरात सुख-शांती बनते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी