Chaturmas 2022: कधीपासून सुरू होतोय चार्तुमास, या दरम्यान करू नयेत शुभकामे

आध्यात्म
Updated Jun 16, 2022 | 12:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Chaturmas 2022: चातुर्मासात कोणत्याही प्रकारची शुभ कार्ये केली जात नाहीत. चातुर्मासाला देवशयनी एकादशीसह प्रारंभ होतो. 

vishnu
कधीपासून सुरू होतोय चार्तुमास, या दरम्यान करू नयेत शुभकामे 
थोडं पण कामाचं
  • यावेळेस चातुर्मास १० जुलैला सुरू होत असून तो ४ नोव्हेंबर २०२२मध्ये संपणार आहे.
  • चातुर्मासात विवाह कार्ये, गृह प्रवेश, भूमी पूजन, मुंडन, तिलकोत्सव इत्यादी कार्ये केली जात नाहीत.
  • चातुर्मासात थाळी सोडून पानांवर जेवणे करणे अत्यंत शुभ मानले जाते. 

मुंबई: हिंदू पंचागानुसार आषाढ महिन्याच्या शुक्ल पाच्या एकादशी तिथीला म्हणजेच १० जुलै २०२२ला देवशयनी एकादशी(devshayani ekadashi) असणार आहे. या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेमध्ये पाताळ लोकात जातील. यासोबतच चातुर्मासाला(chaturmas) प्रारंभ होईल. यानंतर कोणतीच मंगल कार्ये केली जात नाहीत. यानंतक कार्तिक महिन्यात देवोत्थान एकादशीला जेव्हा भगवान विष्णू निद्रेतून जागे होत पुन्हा या लोकात येतील आणि माता तुलसीसोबत विवाह होईल. यानंतर सर्व मंगल कार्ये पुन्हा सुरू होतील आणि चातुर्मास संपेल. know the starting and end date of chaturmas 2022

अधिक वाचा - तीन शब्दांचा राजीनामा Viral

यावेळेस चातुर्मास १० जुलैला सुरू होत असून तो ४ नोव्हेंबर २०२२मध्ये संपणार आहे. या दरम्यान कोणत्याही प्रकारची शुभ कार्ये केली जात नाहीत. 

चातुर्मासात कोणती कामे करावी आणि कोणती कामे करू नयेत

चातुर्मासात विवाह कार्ये, गृह प्रवेश, भूमी पूजन, मुंडन, तिलकोत्सव इत्यादी कार्ये केली जात नाहीत. चातुर्मासात ही कार्ये केल्याने अशुभ फल प्राप्ती होते. 

चातुर्मासात थाळी सोडून पानांवर जेवणे करणे अत्यंत शुभ मानले जाते. 

बेडवर झोपण्याऐवजी जमिनीवर झोपले पाहिजे. असे केल्याने सूर्यदेवाची आपल्यावर कृपा होते. 

असं म्हटलं जातं की चातुर्मासात मांस तसेच दारूचे सेवन करणे अशुभ फळ देणारे असते. 

चातुर्मासात भगवान विष्णूची पुजा करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. लक्ष्मी मातेचे आगमन होते. 

या महिन्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद करणे टाळले पाहिजे. खोटं बोलू नये. 

अधिक वाचा - ऊसाचा रस पिण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, नाहीतर ...

तुळशीची पुजा केली पाहिजे. संध्याकाळी तुळशीकडे दिवा लावा. समस्या कमी होतील. 

चातुर्मासादरम्यान गूळ, तेल, मध, मुळा, परवल, वांगे, साग यांचे सेवन करू नये. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी