इक्ष्वाकुंची अयोध्या, रघुकुलचे श्रीराम - प्रभूच्या वंशावळीशी निगडित सर्व गोष्टी

आध्यात्म
Updated Aug 05, 2020 | 10:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

Prabhu Shri Ram's lineage: भगवान राम यांचा जन्म होण्याआधीच त्यांचे वंशज अयोध्येवर राज्य करत होते. प्रभूची वंशावळी खूप मोठी आणि प्रतापी आहे. वाल्मिकी रामायण आणि तुलसीदास मानसमध्ये यांचा उल्लेख आढळतो. 

shree ram
प्रभू श्री रामचंद्रांची संपूर्ण वंशावळ 
थोडं पण कामाचं
  • श्रीराम यांचे वंशज रघुप्रताप यांच्यापासून सुरू झाला होता रघुकुलचा प्रवास
  • इक्ष्वाकु यांनी स्थापन केली होती अयोध्या
  • ध्रुवसन्झधि वंशामध्ये झाला होता श्रीराम भगवानांचा जन्म

मुंबई: अयोध्या आणि श्री राम एक दुसऱ्यांना पूरक मानण्यात आले आहेत. भगवान राम यांचे जन्मस्थळ असल्यामुळे हिंदुंसाठी ही आराध्य नगरी मानण्यात आली आहे. भगवान रामाच्या जीवन प्रसंगातील अनेक आध्याय अयोध्याशी संबंधित आहेत. रामायण आणि राम चरित मानसमध्ये असलेल्या अनेक प्रसंगामुळेच समजते की प्रभू राम यांच्या जन्माआधी त्यांच्या वंशजांनी अयोध्येला आपली राजधानी बनवलूी होती. आदर्श, प्रेम आणि त्याग हे गुण असलेले मर्यादा पुरुषोत्तम केवळ प्रभू रामच नव्हे तर त्यांची वंशावळही महान आहे. रामायण आणि तुलसी मानसच्या आधारावर जाणून घेऊया भगवान श्रीराम यांच्या वंशजांनी सर्वप्रथम अयोध्यला आपली राजधानी बनवले होते आणि रघुकुल वंशाची सुरूवात कशी झाली होती. 

जाणून घ्या प्रभू श्री रामचंद्रांची संपूर्ण वंशावळ

प्रभू श्रीराम इक्ष्वाकु वंशाचे होते आणि या वंशाचे गुरू वासिष्ठ जी होते. भगवान श्रीराम यांची वंशावळ खूपच व्यापक आणि प्रभावशाली होती. ब्रम्हांपासून मरिचीचा जन्म झाला होता. मरिचीचे पुत्र कश्यप होते. कश्यप यांचे पुत्र विवस्वान आणि विवस्वान यांचे पुत्र वैवस्वत मनू होते. वैवस्वत मनु यांचे पुत्र इक्ष्वाकु होते. तर इक्ष्वाकु यांचे पुत्र कुक्षि होते. कुक्षि यांचे पुत्रांचे नाव विकुक्षि  होते. विकुक्षिच पुत्र बाण आणि बाण यांचे पुत्र अनरण्य. अनरण्य यांच्या पुत्राचे नाव पृथु आणि पृथु यांच्या पुत्राचे नाव त्रिशंकु आहे. त्रिशंकु यांचे पुत्र धुन्धुमार आणि धुन्धुमार यांचे पुत्र युवनाश्व. युवनाश्व यांचे पुत्र मान्धाता तर मान्धाता यांच्याकडून सुसन्धिंचा जन्म झाला.

सुसन्धि यांना दोन पुत्र झाले - ध्रुवसन्धि आणि प्रसेनजित. ध्रुवसन्धि यांचे पुत्र भरत आणि भरताचे पुत्र असित. असित यांचे पुत्र सगर आणि सगर यांचे पुत्र असमन्न यांचा जन्म झाला. असमन्न यांचे पुत्र अंशुमान आणि अंशुमान यांचे पुत्र दिलीप होते. दिलीप यांचे पुत्र भगीरथ आणि भगीरथ यांचे पुत्र ककुस्थ होते. ककुस्थ यांचे पुत्र रघु यांचा जन्म झाला आणि रघु यांचे पुत्र प्रवृद्ध होते. प्रवृद्ध यांचे पुत्र शंखण आणि शंखण यांचे पुत्र सुदर्शन यांचा जन्म झाला. सुदर्शन यांचे पत्र अग्निवर्ण आणि अग्निवर्ण यांचे पुत्र शीघ्रग यांचा जन्म झाला.

शीघ्रग ययांचे पुत्र मरू आणि मरू याचे पुत्र प्रशुश्रुक होते. प्रशुश्रुक यांचे पुत्र अम्बरीश यांचा जन्म झाला आणि अम्बरीश यांचे पुत्र नहुष होते. नहुष यांचे पुत्र ययाति आणि ययाति यांचे पुत्र नाभाग होत. नाभाग यांचे पुत्र अज आणि अज यांचे पुत्र राजा दशरथ. राजा दशरथ यांचे चार पुत्र होते श्री रामचंद्र, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. भगवान श्री रामचंद्र यांचे पुत्र लव आणि कुश. 


इक्ष्वाकु यांनी स्थापन केली होती अयोध्या

भगवान श्रीराम यांचे पूर्वज इक्ष्वाकु यांनी सर्वप्रथम आपल्या राज्याला राजधानी बनवले होते. 

रघुकुश वंशाची सुरूवात

प्रभू श्रीरामाचे वंशज रघू खूप पराक्रमी, तेजस्वी आणि महान राजा होते. भगवान प्रभू यांचे वंशज भागीरथ यांच्या तपस्येचा परिणाम होता ज्यामुळे गंगा धरतीवर प्रकट झाली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी